Rj Mahvash Dhanashree Verma X
Sports

काहीतरी शिक... युजवेंद्र चहलच्या कथित गर्लफ्रेंड Rj Mahvash ने शेअर केले फोटो, पण धनश्री वर्माला धारेवर धरलं

Rj Mahvash Instagram Post : युजवेंद्र चहल आणि आरजे महावश एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. महावशने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

Yash Shirke

Yuzvendra Chahal Rj Mahvash : युजवेंद्र चहल मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स या सामन्यामध्ये चहलने हॅटट्रीक घेतली. हॅटट्रीक घेतल्यानंतर चहलची कथित गर्लफ्रेंड आरजे महावशने इन्स्टास्टोरी शेअर करत चहलचे कौतुक केले. महावश खास युझी चहलला सपोर्ट करण्यासाठी पंजाबचे सामने पाहायला जात असल्याचे पाहायला मिळाले आहे.

धनश्री वर्माशी घटस्फोट झाल्यानंतर भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलचे नाव आरजे महावशशी जोडण्यात आले. पण घटस्फोट होण्यापूर्वीच चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये युजवेंद्र चहल आणि आरजे महावश पहिल्यांदा एकत्र दिसले होते. सोशल मीडिया पोस्ट्स, फोटो आणि व्हिडीओमुळे ते दोघे डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. महावशच्या प्रत्येक पोस्टशी चहलचे नाव जोडले जाते. अशाच एका पोस्टची सध्या चर्चा पाहायला मिळत आहे.

शनिवारी (३ मे) आरजे महावशने सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये आरजे महावश खूपच सुंदर आणि मनमोहक दिसत होती. चाहत्यांनी पोस्टच्या खाली कमेंट्स करत महावशचे कौतुक केले. काहीजणांनी युजवेंद्र चहलचा उल्लेख केला. एका चाहत्याने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले. या चाहत्याने धनश्री वर्माचे नाव घेत 'महावशकडून काहीतरी शिक' अशी कमेंट करत धनश्रीला ट्रोल केले आहे.

Rj Mahvash Instagram Post

आज (४ मे) आयपीएल २०२५ मधील डबल हेडर रविवार आहे. डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यामध्ये पंजाब किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना पंजाब आणि लखनऊ या दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण आहे. आजच्या सामन्यात पंजाबच्या संघाला आणि युजवेंद्र चहलला सपोर्ट करण्यासाठी आरजे महावश धर्मशालाच्या स्टेडियमवर पोहोचेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: दुर्गापूजेपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार? मोठी मागणी समोर

5 Energy Booster Ladoo: ताकद आणि पोषणाचा खजिना! आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ ५ एनर्जी बुस्टर लाडू

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT