Yuvraj Singh  
Sports

Yuvraj Singh: पोरगीला पाहून युवराजला सामन्यात धावा करता येईना; स्वत:नेच सांगितला अभिनेत्रीसोबतचा डेटिंगवाला किस्सा

Yuvraj Singh : माजी क्रिकेटर युवराज सिंगने एका अभिनेत्रीसोबतच्या डेटिंगचा किस्सा एका पॉडकॉस्ट कार्यक्रमात सांगितलाय.

Bharat Jadhav

भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंग 2007 मध्ये एका अभिनेत्रीला डेट करत होता. ती अभिनेत्री आजही लोकप्रिय आहे. याचा खुलासा खुद्द क्रिकेटरने केलाय. युवराज सिंगने त्याच्या डेटिंगचा एक किस्सा एका पोस्टकास्ट कार्यक्रमात सांगितलाय. यावेळी बोलातांना त्याने त्यांचा एक किस्सा या कार्यक्रमात सांगितला.

युवराजने अभिनेत्री हेजल कीचशी लग्न केलंय. पण त्याने त्याआधी आणखी एका अभिनेत्रीला डेट केलंय. ज्यावेळी त्याच्या आयुष्यात हेचल नव्हती. टीम इंडिया जेव्हा कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होती. त्यावेळी युवराज सिंग आणि अभिनेत्रीचं प्रेम खूप फुललं होतं.

अभिनेत्रीला सांगितलं भेटू नकोस

भारत 2007-08 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना खेळत होता. त्यावेळी युवराज सिंग एका अभिनेत्रीला डेट करत होता. ही अभिनेत्री एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी ऑस्ट्रेलियात होती. आणि युवराज सिंगही त्याच्या कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियात होता. त्यावेळी ही अभिनेत्री भारतीय क्रिकेट संघाच्या दौऱ्यादरम्यान कॅनबेराला युवराजच्या मागेमागे गेली होती. परंतु

जेव्हा तो तिला भेटला तेव्हा युवराज त्याच्या कारकिर्दीतील अत्यंत तणावपूर्ण टप्प्यात होता. या दौऱ्यात त्याने चांगली कामगिरी केली नव्हती आणि त्याला त्याच्यावरील दबाव जाणवत होता. यामुळे, त्याला खेळावर लक्ष केंद्रित करायचे होते आणि त्याने अभिनेत्रीला काही काळ त्याला भेटू नका असे सांगितले होतं. तरीही ती अभिनेत्री भेटली आणि युवराजला डोक्याला हात लावावा लागला होता.

काय आहे तो किस्सा

“मी एका अभिनेत्रीला डेट करत होतो, मी तिचे नाव घेणार नाही. ती सध्या खूप चांगली आहे आणि खूप अनुभवी आणि लोकप्रिय आहे. ती तेव्हा ॲडलेडमध्ये शूटिंग करत होती. मी तिला म्हणालो, ऐक, आपण भेटू नये काही दिवस, कारण मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. आणि लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. पण अभिनेत्री त्याचं ऐकलं नाही आणि ती माझ्या मागे बसमध्ये कॅनबेराला आली. ती स्टेडियमला असतांना तेव्हा माझी फलंदाजी चांगली होत नव्हती. दोन कसोटीत मी जास्त धावा करू शकलो नाही. त्यावेळी मी तिला म्हटलं की तू येथे काय करत आहेस?' त्यावर ती म्हणाली 'मला तुमच्याबरोबर वेळ घालवायचा आहे.

त्यानंतर मी तिला रात्री भेटलो आणि आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली. मी तिला सांगितले की तू तुझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. मलाही माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. कारण मी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे, याचा अर्थ तुला माहीत आहे. हे किती महत्त्वाचे आहे ते. त्यानंतर आम्ही कॅनबेराहून ॲडलेडला निघालो होतो आणि तिने माझी सुटकेस पॅक केली.

त्यावेळी तिने युवराजचे शूज सूटकेसमध्ये पॅक केले होते. त्याला टीमच्या बसमध्ये चढायला 10 मिनिटे उरली होती. मग तो घाईने बसकडे निघाला. तेव्हा त्याला त्याच्या पायात घायला बूट नव्हते. तो बूट शोधू लागला. परंतु त्याला बूट सापडले नव्हते. खूप शोधल्यानंतरही बूट मिळत नसल्याने त्याला अभिनेत्रीने तिचे गुलाबी स्लिप ऑन चप्पल घालण्याचे सांगितले. दुसरा कोणताही पर्याय नसताना युवराजने स्लिप ऑन म्हणजेच गुलाबी रंगाच्या चप्पला घातल्या. तेव्हा बसमध्ये बसलेले इतर खेळाडूंनी त्याच्याकडे पाहत टाळ्या वाजवल्या होत्या. ते पाहून मला हासू आवरता येत नव्हतं, असं युवराज सिंगने या कार्यक्रमात मुलाखत देतांना सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT