Happy Birthday Yuvraj Saam Tv
Sports

Happy Birthday Yuvraj: युवराजच्या ताफ्यात आहेत 'या' आलीशान गाड्या, किमती ऐकून चक्रावून जाल

युवराजच्या कार कलेक्शनमध्ये एकापेक्षा एक आलिशान गाड्यांचा समावेश आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: भारतीय क्रिकेटपटूंच्या खेळाईतकीच त्यांच्या लक्झरी लाईफचीही नेहमीच चर्चा होताना दिसत असते. हार्दिक पांड्या असो किंवा विराट कोहली असो, भारतीय क्रिकेटपटूंना नेहमीच महागड्या गाड्यांचे वेड असते. त्यामुळेच एकापेक्षा एक आलीशान गाड्या हे खेळाडू खरेदी करत असतात. या यादीत माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचेही नाव घेतले जाते. क्रिकेटमधून संन्यास घेतला असला तरी युवराज सिंग सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. आज (१२, डिसेंबर) युवराज सिंगचा वाढदिवस. जाणून घेवूया युवराजच्या महागड्या कार कलेक्शनबद्दल.

भारतीय माजी क्रिकेटर युवराज सिंगने गेली दोन दशके चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. २००७चा टी२० वर्ल्ड कप असो की २०११ चा वन-डे वर्ल्ड कप असो, युवराजचे योगदान अतिशय महत्त्वाचे ठरले. आपल्या स्फोटक फलंदाजीने युवराजने अनेक सामन्यांमध्ये भारताला एकहाती विजय मिळवून दिला आहे. त्यामुळेच त्याच्या स्फोटक खेळींजी आजही क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा रंगलेली असते. क्रिकेटसोबतच युवराज सिंग त्याच्या लक्झरी लाईफस्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. क्रिकेटमधून निवृत्तीनंतर युवराज आपली पत्नी-मुलांसह वरळीच्या आलिशान अशा घरात राहतो.सोबतच युवराजच्या कार कलेक्शनमध्ये एकापेक्षा एक आलिशान गाड्यांचा समावेश आहे.

मीडिया रिपोट्सनुसार, युवराजच्या ताफ्यात एक मिनी कूपर कंट्रीमॅन कार आहे ज्याची किंमत ४४.९ लाख आहे. अलिकडेच युवराजने बीएमडब्ल्यू X7 कार खरेदी केली आहे ज्याची किंमत १. २९ कोटींच्या पुढे आहे. सोबतच युवराजकडे ६९ लाख रुपयांची ऑडीQ5 आहे.युवराजच्या ताफ्यातील आणखी एक महागडी कार म्हणजे बीएमडब्ल्यू एम5 . या आलीशान कारची किंमत तब्बल १.७४ कोटींच्या पुढे आहे. युवीकडे बेंटले कॉन्टिनेंटल जीटी देखील आहे. बेंटले मोटर्स लिमिटेड या ब्रिटीश ऑटोमोबाईल कंपनीने विकलेला हा एक भव्य टूरर आहे. हे 6.0L ट्विन-टर्बो W12 इंजिन 8-स्पीड पोर्श PDK ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. या कारची किंमत 3.91 कोटी रुपयांपासून सुरू होते.

दरम्यान, युवराजने आपल्या क्रिकेट कारकिर्दित 402 आंतरराष्ट्रीय सामने, 11,778 धावा, 17 शतके आणि 148 विकेट्स घेतल्या आहेत. २००७ च्या विश्वचषकामध्ये एका षटकात सहा सिक्स लगावण्याचा भीम पराक्रम त्याने केला होता. क्रिकेटविश्वातील सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रमही युवराज सिंगच्या नावावर आहे.

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT