भारताचा माजी खेळाडू 'युवराज सिंग'ला अटक; पण जामीनावर सुटका Twitter
Sports

भारताचा माजी खेळाडू 'युवराज सिंग'ला अटक; पण जामीनावर सुटका

हंसीमध्ये युवराजवर गुन्हा दाखल झाल्यानंतर युवराज सिंगची विचारपुस करण्यासाठी पोलिसांनी त्याला बोलवले होते.

वृत्तसंस्था

पंजाब: इंस्टाग्राम लाईव्हवर सहकारी खेळाडूंशी संभाषणादरम्यान जातीयवादी शब्द वापरणाऱ्या भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगवर न्यायालयाने कडकपणा दाखवला आहे. हंसीमध्ये युवराजवर गुन्हा दाखल झाल्यानंतर युवराज सिंगची विचारपुस करण्यासाठी पोलिसांनी त्याला बोलवले होते. पोलिसांनी त्याला अटक दाखवून अधीक तपास केला आहे. युवराज सिंगने या प्रकरणात आधीच उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन घेतला आहे. कोर्टाने युवराज सिंगला हांसीमध्ये दाखल झालेल्या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आदेश दिले होते. यासाठी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशाने युवराज हिसारमधील जिओ मेसमध्ये पोहोचला होता. तो त्याच्या चार-पाच सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत चंदीगडहून हिसारला पोहोचला.

युवराज सिंगने स्वतः उच्च न्यायालयामध्ये अनुसूचित जातींवर टिप्पणी केल्याची गोष्ट स्वीकारली होती, परंतु हा शब्द बोलणे चुकीचे आहे याची त्याला जाणीव नसल्याचे सांगितले. कोणाच्या भावना दुखावण्यासाठी हे बोललो नाही. चौकशीनंतर युवराज सिंगची उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार औपचारिक जामिनावर सुटका करण्यात आली आहे. आता हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

हे आहे प्रकरण

हंसीचे वकील रजत कलसन यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती की युवराज सिंगने आपल्या सहकाऱ्यांसह इंस्टाग्राम लाईव्हवर एससी समुदायावर टिप्पणी केली होती. यानंतर युवराज सिंगवर कलम 153A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. युवराज सिंगने हा खटला निकाली काढण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यावर उच्च न्यायालयाने युवराजला अटकपूर्व जामिनाचे आदेश दिले होते. याआधी युवराज सिंगचे वकील पुनीत बाली यांनी न्यायालयात म्हटले होते की, हे संभाषण मित्रांमध्ये झाले. कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : जोडीदारासोबत आज काय घडणार? ही रास तुमची तर नाही? वाचा गुरुवारचे भविष्य

Crime : बीडमधील माजी उपसरपंचाचा सोलापुरात संशयास्पद मृत्यू, तक्रारीत नर्तिकेचं नाव; नातेवाईकांना वेगळाच संशय

Toyota Cars Offers: अंबाबाईच्या नावानं चांगभलं! फक्त ९९ रुपयांच्या हप्त्यांमध्ये घरी आणा कार, अन् ५ फ्री सर्विससह ४ धमाकेदार फायदे

Maharashtra Live News Update : डहाणूहून विरारकडे जाणाऱ्या लोकलमध्ये बिघाड

मुंबईत इमारतीला आग, घाबरलेल्या दोघांनी खिडकीतून मारली उडी, सुदैवानं....| VIDEO

SCROLL FOR NEXT