कार्यकाळ संपण्याआधीच युनूस खानने प्रशिक्षक पदाचा दिला राजीनामा Saam Tv
Sports

कार्यकाळ संपण्याआधीच युनूस खानने दिला प्रशिक्षक पदाचा राजीनामा

पाकिस्तान क्रिकेट संघाचा फलंदाजी प्रशिक्षक युनूस खानने नाराज होऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पाकिस्तान क्रिकेट संघाचा (Pakistan Cricket Team) फलंदाजी प्रशिक्षक युनूस खानने नाराज होऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. युनूस खानचा कार्यकाळ 2022 च्या टी-20 विश्वचषकापर्यंत होता. युनिस खानचा (Younis Khan) राजीनामा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्वीकारला आहे. इच्छा नसतानाही पाकिस्तान बोर्डाने त्यांचा राजीनामा प्रेमळपणे स्वीकारला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, युनिस खानने असे पाऊल का उचलले हे पीसीबीकडून सांगण्यात आले नाही.

पाकिस्तानचा संघ 8 जूलै ते 20 जुलै दरम्यान तीन एकदिवसीय आणि तीन टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी ब्रिटनचा दौरा करणार आहे. त्यानंतर हा संघ 21 जुलै ते 24 ऑगस्ट दरम्यान वेस्ट इंडीजमध्ये जाईल आणि तेथे पाच टी -20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. संघाच्या जाण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निवेदनात असे म्हटले आहे की, पाकिस्तानचा पुरुष क्रिकेट संघ फलंदाजी प्रशिक्षकाविनाच ब्रिटनला जाईल. परंतु युनिस खानच्या जागी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी प्रशिकपदाचा निर्णय नंतर केला जाईल.

पीसीबीच्या घोषणेनंतर, युनुसने स्वत: संघातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. संघाच्या भूमिकेबद्दल युनूस खान आनंदी नव्हता. निवड प्रकरणात त्याला अधिक हस्तक्षेप हवा होता असे वृत्त समोर येत आहे. सूत्रांच्या मते, भविष्यात राष्ट्रीय संघ ज्या प्रकारे तयार केला जात आहे त्याबद्दल युनूस समाधानी नव्हता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दोन वर्षांसाठी युनूसची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याचा कार्यकाळ 2022 च्या टी-२० विश्व चषकापर्यंत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT