Ravi Shastri Statement: भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री नेहमीच आपल्या रोकठोक विधानांमुळे चर्चेत असतात. नुकताच त्यांनी आयपीएल स्पर्धेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी आयपीएल स्पर्धेचं तोंडभरून कौतुक केल्याचं पाहायला मिळालं आहे. काही दिवसांपूर्वीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता.
या पराभवानंतर आयपीएल स्पर्धेवर देखील टीका होऊ लागली आहे. कारण आयपीएल झाल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला होता.
मात्र रवी शास्त्रींच्या मते भारतीय क्रिकेट आज ज्या स्थितीत आहे, त्यामागचं कारण म्हणजे आयपीएल स्पर्धा आहे.
रवी शास्त्री यांनी द विकला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, 'मला मुळीच वाटत नाही की,आयपीएलमुळे कुठलीही समस्या निर्माण होत असेल. भारतीय क्रिकेट आता ज्या स्थितीत आहे, त्यासाठी तुम्ही नक्कीच आयपीएलचे आभार मानले पाहिजे. मला माहित आहे की, हे लोकांना पटणार नाही. मात्र मी हे मनापासून बोलतोय. तुम्ही आयपीएलचे आभार मानायला हवेत.'
तसेच ते पुढे म्हणाले की, 'या स्पर्धेतून अनेक युवा खेळाडू जगासमोर आले आहेत. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल सारखे खेळाडू याच स्पर्धेतून पुढे आले आहेत. लोक ही कामगिरी सोडून हे पाहतात की त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कशी कामगिरी केली आहे. हा एक मोठा स्टेज आहे..त्यामुळे आयपीएल स्पर्धेवर बोट उचलू नका.' (Latest sports updates)
याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की, 'खेळाडूंकडे कुठलेच अधिकार नाहीत. तर सर्व अधिकार बीसीसीआयकडे आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या वेळी बीसीसीआयने वेळापत्रक अशा पद्धतीने तयार करायला हवं होतं की, खेळाडूंना विश्रांती करायला वेळ मिळाला असता आणि सामन्याची तयारी करायला ही वेळ मिळाला असता. यासाठी तुम्हाला काही खेळाडूंना बाहेर बसवावं लागेल.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.