yashasvi jaiswal  saam tv
Sports

Yashasvi Jaiswal Emotional Statement: पदार्पणात शतक झळकावताच भावूक झाला जयस्वाल; म्हणाला,' हा क्षण माझ्यासाठी...'

Yashasvi Jaiswal After Century: पहिल्याच कसोटीत शतक झळकावणारा यशस्वी जयस्वाल भावूक झाल्याचे दिसून आले आहे.

Ankush Dhavre

IND vs WI 1st Test : डॉमिनिकाच्या मैदानावर भारत विरुद्ध वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालच्या विक्रमी भागीदारीच्या बळावर भारतीय संघाने मोठी आघाडी घेतली आहे.

भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत २ गडी बाद ३१२ धावा केल्या आहेत. यासह भारतीय संघाने १६२ धावांची आघाडी घेतली आहे. दरम्यान पहिल्याच कसोटीत शतक झळकावणारा यशस्वी जयस्वाल भावूक झाल्याचे दिसून आले आहे.

शतक झळकावल्यानंतर काय म्हणाला यशस्वी जयस्वाल?

शतकी खेळीबद्दल बोलताना यशस्वी जयस्वाल म्हणाला की, 'ही खेळी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. भारतीय संघात स्थान मिळवणं खूप कठीण आहे. मात्र मला संधी मिळाली. मी टीम मॅनेजमेंट, रोहित शर्मा आणि माझ्या चाहत्यांचे आभार मानतो.'

तसेच तो पुढे म्हणाला की, ' डॉमिनिकाची खेळपट्टी आणि आऊटफिल्ड खूप स्लो आहे. त्यामुळे इथे धावा करणं खूप आव्हानात्मक आहे. इथे वातावरण खूप गरम आहे. मी प्रत्येक चेंडू खेळण्याचा आणि माझा गेम एन्जॉय करण्याच्या प्रयत्नात होतो.'

तसेच तो पुढे म्हणाला की, ' मला कसोटी क्रिकेट खूप आवडतं. जेव्हा चेंडू स्विंग होत असतो तेव्हा मला आणखी मजा येते. हा माझ्यासाठी खूप खास आणि भावूक करणारा क्षण आहे. मी सर्वांचे आभार मानतो. ही माझी सुरुवात आहे. येणाऱ्या काळात मी आणखी चांगलं करण्याचा पर्यंत करेल.' (Latest sports updates)

भारतीय संघाची आघाडी..

या सामन्यात पहिल्या दिवसापासून भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. प्रथम गोलंदाजी करताना भारतीय संघाकडून आर अश्विनने सर्वाधिक ५ गडी बाद केले होते. वेस्टइंडीजचा पहिला डाव अवघ्या १५० धावांवर संपुष्टात आला होता.

तर या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालने विक्रमी भागीदारी करत भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहचवलं आहे. दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत भारतीय संघाची धावसंख्या २ गडी बाद ३१२ धावा इतकी आहे. यासह भारतीय संघाने या डावात १६२ धावांची आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठ....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Raj Thackeray Look: डोळ्याला गॉगल अन् गळ्यात मफलर; विजयी मेळाव्यातील राज ठाकरेंचा स्टायलिश लूक

SCROLL FOR NEXT