team india google
Sports

Team India News: द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर या ३ खेळाडूंची कारकिर्द संपली? संधी मिळूनही ठरले सुपरफ्लॉप

India vs South Africa: नुकताच भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली होती.

Ankush Dhavre

Team India Players Flop Show In IND vs SA Test Series:

नुकताच भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली होती. तर दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने दमदार कमबॅक केलं आणि दक्षिण आफ्रिकेवर ७ गडी राखून जोरदार विजय मिळवला.

यासह ही मालिका १-१ च्या बरोबरीत समाप्त झाली. या मालिकेसाठी भारतीय संघात काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली होती. हे युवा खेळाडू नावाला साजेशी कामगिरी करू शकलेले नाहीत. दरम्यान ३ असे खेळाडू आहेत जे पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत.

यशस्वी जयस्वाल:

डाव्या हाताचा आक्रमक सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालला भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करण्याची संधी दिली गेली होती. मात्र तो या संधीचा लाभ घेऊ शकलेला नाही. त्याला २ सामन्यातील चारही डावात सलामीला पाठवलं.

यादरम्यान तो केवळ ५० धावा करू शकला. भारतीय संघाला त्याच्याकडून मोठ्या खेळीसह आक्रमक सुरुवात करुन देण्याची अपेक्षा होती. मात्र तो असं करू शकलेला नाही. यापुढे भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. जर त्याची अशीच कामगिरी सुरू राहिली तर त्याचं संघातील स्थान धोक्यात येऊ शकतं. (Latest sports updates)

शुभमन गिल:

शुभमन गिलवर आता लिमिटेड ओव्हर प्लेअर असा टॅग लावला जातोय. वनडे आणि टी -२० क्रिकेटमध्ये तो चमकला, मात्र कसोटीत त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. भारतीय संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर गेला असताना शुभमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा प्रयोग करण्यात आला.

मात्र हा प्रयोग कुठेतरी फसलाय असं दिसून येत आहे. कारण तो तिसऱ्या क्रमांकावर खेळताना आपली छाप सोडू शकलेला नाही. या मालिकेतील २ सामन्यातील ४ डावात त्याला अवघ्या.. धावा करता आल्या आहेत.

प्रसिद्ध कृष्णा:

भारत - दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला. संघाचा हुकमी एकक मोहम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर पडला. बुमराह आणि सिराज यांनी गोलंदाजीत चांगली भागीदारी केली. मात्र जेव्हा प्रसिद्ध कृष्णाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. त्यावेळी तो विकेट्स घेऊ शकला नाही.

प्रसिद्ध कृष्णाला खेळपट्टीतून उसळी मिळत होती. मात्र अचूक टप्पा आणि गोलंदाजीत विविधता नसल्याने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला. दरम्यान २ कसोटी सामन्यात त्याला केवळ १ गडी बाद करता आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

SCROLL FOR NEXT