Yashasvi Jaiswal Century In Leeds Test saam tv
Sports

Ind Vs Eng: लीड्सवर 'यशस्वी' आघाडी! इंग्लंडच्या भूमीवर युवा फलंदाज जयस्वालनं इतिहास रचला, पहिल्याच दिवशी शतकी तडाखा

Yashasvi Jaiswal Century In Leeds Test: टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने इंग्लंड दौऱ्याची सुरुवात अतिशय धमाकेदार पद्धतीने केली आहे.

Bharat Jadhav

इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात, भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने हेडिंग्ले लीड्स येथे शानदार शतक ठोकलं. हे त्याच्या क्रिकेट कारकीर्दीतील पाचवे शतक आहे. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर रंगलाय. या सामन्यात शुभमन गिलच्या भारतीय संघाचे नेतृत्त्व करत आहे.

भारतीय संघात अनेक उत्साही युवा खेळाडूंना संधी देण्यात आलीय. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे क्रिकेटप्रेमींचं विशेष लक्ष लागलंय. दरम्यान इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. कसोटीच्या पहिल्या डावात, जैस्वालने आपल्या समजूतदारपणा आणि तांत्रिक फलंदाजीने इंग्लंडच्या गोलंदाजांना धडा शिकवला. त्याच्या खेळीमुळे भारताला केवळ चांगली सुरुवात मिळाली नाही तर इंग्लंड दौऱ्यात त्याची महत्त्वाची भूमिकाही दिसून आली.

लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात त्याने शतक झळकावले. जैस्वालने १४४ चेंडूत आपले शतक पूर्ण केलं. हेडिंग्लेच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मैदानाच्या अलिकडच्या रेकॉर्डचा विचार केला तर हा निर्णय त्यांच्या बाजूने होता. परंतु यशस्वी जैस्वालने आपल्या फलंदाजीने हा निर्णय चुकीचा सिद्ध केला.

केएल राहुलसोबत डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या जैस्वालने सुरुवातीपासूनच शानदार खेळ दाखवला. त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांच्या स्विंग गोलंदाजीचा चांगला सामना केला. यशस्वी जैस्वालने शतक पूर्ण करण्यासाठी १४४ चेंडूंचा सामना केला. त्याने १६ चौकार आणि १ षटकार मारला. जैस्वालचा इंग्लंडविरुद्धचा हा सहावा सामना आहे.

विशेष म्हणजे त्याने या संघाविरुद्धच्या प्रत्येक कसोटीत ५०+ धावा केल्या आहेत. याआधी त्याने इंग्लंडविरुद्ध २ द्विशतकेही झळकावली आहेत. जैस्वाल हा पहिल्यांदा इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळतोय, पहिल्याच सामन्यात त्याने शतक ठोकलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morcha: रिक्षा- कॅब चालकांचा मुंबईत एल्गार! आझाद मैदानावर धडक मोर्चा; काय आहेत प्रमुख मागण्या?

Sabudhana Khichdi: रोजची साबुदाणा खिचडी होईल आणखी टेस्टी, फक्त वापरा 'हा' पदार्थ

Maharashtra Live News Update: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकासभाई सावंत यांच निधन

भयंकर! शायनिंग मारायला गेला अन् ट्रेनच्या खाली चिरडला, २ किमीपर्यंत फरफटत गेला, पण... व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल

India First Car: भारतात पहिली कार कधी आली? जाणून घ्या इतिहास

SCROLL FOR NEXT