yashasvi jaiswal saam tv news
Sports

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वाल खरंच पाणीपुरी विकायचा का?काय आहे सत्य? जाणून घ्या

Yashasvi Jaiswal Panipuri Story: यशस्वी जयस्वाल हे नाव सध्या तुफान चर्चेत आहे. वनडे असो टी-२० असो किंवा कसोटी क्रिकेट, या युवा फलंदाजाची बॅट आग ओकतेय.

Ankush Dhavre

Yashasvi Jaiswal Panipuri Story:

यशस्वी जयस्वाल हे नाव सध्या तुफान चर्चेत आहे. वनडे असो टी-२० असो किंवा कसोटी क्रिकेट, या युवा फलंदाजाची बॅट आग ओकतेय. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा यशस्वी जयस्वालने स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं आहे.

नुकताच इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेसाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीत तो ८० धावांवर बाद होऊन माघारी परतला होता. त्याचं शतक अवघ्या २० धावांनी हुकलं होतं. तर दुसऱ्या सामन्यातील पहिल्याच डावात त्याने २०९ धावांची खेळी केली आहे.

यशस्वी जयस्वाल भारतीय संघात येण्यापूर्वी काही फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल झाले होते, ज्यात पाणीपूरी विकताना दिसून येत आहे. मात्र खरचं यशस्वी जयस्वाल पाणीपूरी विकायचा का? याबाबत त्याचे कोच ज्वाला सिंग यांनी खुलासा केला आहे.

सध्या भारतीय संघासाठी दमदार खेळी करणाऱ्या यशस्वी जयस्वालने आयपीएल स्पर्धेतही धुमाकूळ घातला होता. या कामगिरीच्या बळावर त्याला भारतीय संघात स्थान देण्याची मागणी जोर धरु लागली होती. यादरम्यान त्याच्या काही स्टोरी व्हायरल झाल्या होत्या.त्यापैकी सर्वाधिक चर्चेत राहिलेली स्टोरी म्हणजे यशस्वी जयस्वाल पाणीपुरी विकायचा. मात्र या स्टोरीमध्ये किती सत्यता आहे? याचा खुलासा स्वत: प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी केला आहे. (Cricket news in marathi)

यशस्वी जयस्वालचे प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी म्हटले की,'यशस्वी जयस्वाल आणि पाणीपुरी विकण्याचा काही एक संबंध नाही. ही स्टोरी पुर्णपणे खोटी आहे. या स्टोरीचा त्याच्या खऱ्या आयुष्याशी काही एक संबंध नाही. ही स्टोरी पाहुन मला खुप वाईट वाटतं कारण ही पुर्णपणे खोटी आहे.' यासह त्यांनी यशस्वी जयस्वालला अशा खोट्या गोष्टींपासून सावध राहण्याचा देखील सल्ला दिला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाणे ते बोरिवली प्रवास १५ मिनिटांत होणार, मुख्यमंत्र्यांकडून गेमचेंजर प्रकल्पाचे शुभारंभ, काय आहेत वैशिष्ट्ये?

Pawan Khera House Raid : काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या घरावर छापेमारी; विधानसभा निवडणुकीआधी मोठी कारवाई; हैदराबादला पळाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार, भरधाव टँकरने तरुणीला चिरडलं

Maharashtra News Live Update: भयंकर! वारजेमध्ये वाहतूक पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दररोज ३०० रुपये गुंतवा अन् १५ लाख मिळवा; फक्त व्याजातून मिळणार ४.४० लाख

SCROLL FOR NEXT