MI VS RR IPL 2023: राजस्थान संघाचे प्रतिनिधित्व करणारा यशस्वी जयस्वाल सध्या आयपीएल २०२३ स्पर्धेत रॉयल कामगिरी करतोय. या हंगामात फलंदाजी करताना त्याने जोरदार कामगिरी केली आहे. रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला.
या ऐतिहासिक सामन्यात यशस्वी जयस्वालने तुफानी शतकी खेळी केली. हे त्याचे आयपीएल स्पर्धेतील पहिले शतक असले तरी यापूर्वी देखील त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे लवकरच त्याला मोठी संधी मिळू शकते.
यापूर्वी अनेक असे खेळाडू होऊन गेले ज्यांनी आयपीएल स्पर्धेत जोरदार कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळवले. आता या यादीत यशस्वी जयस्वालचं नाव जोडलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच यशस्वी जयस्वाल हा निळ्या जर्सीमध्ये भारतीय संघासाठी खेळताना दिसून येऊ शकतो.
आयपीएलचा अंतिम सामना येत्या २८ मे रोजी पार पडणार आहे. हा सामना झाल्यानंतर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
यानंतर भारतीय संघाला वेस्टइंडिज आणि आयर्लंड संघाविरुद्ध दोन हात करायचे आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. त्यानंतर आयर्लंड संघाविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची देखील मालिका रंगणार आहे. या संघात यशस्वी जयस्वालची निवड होऊ शकते. (Latest sports updates)
यशस्वी जयस्वालला भारतीय संघात संधी मिळण्याचं आणखी एक प्रमुख कारण म्हणजे यावर्षी भारतात वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे.
या स्पर्धेची तयारी म्हणून भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू टी -२० क्रिकेट खेळणं टाळू शकतात. त्यामुळे युवा खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. जर यशस्वी जयस्वालला संधी मिळाली तर, तो भारतीय संघासाठी ओपनिंग करताना दिसून येऊ शकतो.
मुंबई विरुद्ध झळकावले तुफानी शतक..
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना मुंबईकर यशस्वी जयस्वाल मुंबईच्या गोलंदाजांवर चांगलाच बरसला. त्याने या सामन्यात ६२ चेंडूंचा सामना करत १६ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १२४ धावांची खेळी केली.
या खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्स संघाने ७ गडी बाद २१२ धावा केल्या होत्या. तर यशस्वी जयस्वालने ऑरेंज कॅपवर कब्जा केला आहे. त्याने या स्पर्धेतील ९ सामन्यांमध्ये ४२८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ अर्धशतक आणि १ शतक झळकावले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.