Yashasvi Jaiswal  Saam Tv
Sports

Yashasvi Jaiswal Success Story : जयस्वालच्या यशस्वी खेळीचं रहस्य उघड! मुंबईपासून ५० किमी दूर दडलंय तरी काय?

Yashasvi Jaiswal : या सामन्यानंतर त्याने आपल्या यशाचं रहस्य सांगितलं आहे.

Ankush Dhavre

KKR vs RR IPL 2023: यशस्वी जयस्वाल हे नाव सध्या जोरदार चर्चेत आहे. सलामीला येऊन आक्रमक फलंदाजी कशी करायची हे या २१ वर्षीय फलंदाजाने दाखवुन दिलं आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर पार पडलेल्या सामन्यात त्याने नाबाद ९८ धावांची खेळी केली.

त्याचे शतक अवघ्या २ धावांनी हुकले. यापुर्वी मुंबई इंडियन्स संघाविरुध्द झालेल्या सामन्यात त्याने जोरदार शतक झळकावले होते. आयपीएल २०२३ स्पर्धेत त्याने जोरदार कामगिरी केली आहे. दरम्यान या सामन्यानंतर त्याने आपल्या यशाचं रहस्य सांगितलं आहे.

यशस्वी जयस्वालच्या यशाचं रहस्य सराव आहे. तो मुंबईपासुन ५० किमी दुर असलेल्या तळेगावात सरावासाठी जातो. तळेगावात राजस्थान रॉयल्स संघाची अॅकेडमी आहेत. या अॅकेडमीत तो सराव करण्यासाठी जात असतो.

इथेच तो वेगवेगळ्या प्रकारच्या शॉट्सचा सराव देखील करत असतो. हेच कारण आहे की, तो मैदानावर येऊन सहजरित्या तुफान फटकेबाजी करु शकतो.

क्रिकेट हा शरीराआधी डोक्याचा खेळ...

यशस्वी जयस्वालचे विचार हे इतर खेळाडूंपेक्षा जरा हटके आहेत. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी त्याला ही गोष्ट कळाली आहे की, क्रिकेट हा शरीराआधी डोक्याचा खेळ आहे. त्याने म्हटलं आहे की जेव्हा तो एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या खेळाडूंना भेटतो.

त्यावेळी तो आपल्या खेळात काय सुधारणा करता येईल याबाबत गप्पा मारत असतो. तसेच कुठल्याही परिस्थितीत स्वतःवर नियंत्रण कस ठेवायचं याबाबत देखील तो सल्ले घेत असतो. (Latest sports updates)

यशस्वी जयस्वालच्या मते तो फलंदाजी कशी करणार हे त्याच्या सरावावर अवलंबून असते. मैदानात असताना क्रिकेटचा सराव आणि मैदानाबाहेर असताना तो स्वतःला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या फिट कसा ठेऊ शकेल यावर अधिक भर देत असतो. गेल्या काही वर्षांमध्ये त्याने फलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे.

आयपीएल २०२३ स्पर्धेत जोरदार कामगिरी..

राजस्थान रॉयल्स संघासाठी सलामीला फलंदाजी करताना यशस्वी जयस्वालने जोरदार कामगिरी केली आहे. त्याने या स्पर्धेतील १२ सामन्यांमध्ये ५७५ धावता केल्या आहेत. यादरम्यान त्याने ४ अर्धशतके आणि १ शतक झळकावले आहे.

या हंगामात मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने तुफानी शतकी केली होती. हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिलेच शतक होते. त्याला राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात कारकीर्दीतील दुसरे शतक झळकावण्याची संधी होती. मात्र तो ९८ धावांवर नाबाद राहिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lava amoled Blaze 2 5G: लावा ब्लेझ एमोलेड २ ५जी लाँच, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स, किंमत आणि खास वैशिष्ट्ये

Maharashtra Politics : काँग्रेसचा गड ढासळला! सांगलीच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, भाजपमध्ये करणार प्रवेश

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये अनेक बनावट व्होटर आयडी, ठाकरे गटाच्या नेत्याने केला पर्दाफाश

कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढलं, EPFO चा नवीन नियम, PF चे पैसे काढण्यासाठी येणार अडचणी

Maharashtra Politics: नंदुरबारमध्ये राजकीय भूकंप! माजी मंत्री राष्ट्रवादीच्या वाटेवर, अजित पवारांची ताकद वाढणार

SCROLL FOR NEXT