Yashasvi jaiswal and shubhman gill tension increased abishek Sharma may pick for T20 world cup 2024 in team india amd2000 twitter
Sports

T20 World Cup 2024: जयस्वाल अन् गिलचं टेन्शन वाढलं! टीम इंडियाला मिळालाय 'हिटमॅन'पेक्षाही विस्फोटक फलंदाज

Abhishek Sharma News: भारतीय संघ येत्या जून महिन्यात टी -२० वर्ल्डकप खेळण्यासाठी वेस्टइंडीजला रवाना होणार आहे. या स्पर्धेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. या संघात स्थान मिळवण्यासाठी सर्वच खेळाडूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघ येत्या जून महिन्यात टी -२० वर्ल्डकप खेळण्यासाठी वेस्टइंडीजला रवाना होणार आहे. या स्पर्धेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. या संघात स्थान मिळवण्यासाठी सर्वच खेळाडूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल या फलंदाजांना सलामीवीर फलंदाज म्हणून स्थान मिळणार अशी चर्चा सुरू असताना अभिषेक शर्माने वादळी खेळी केली आहे. त्याने या संपूर्ण हंगामात धावांचा पाऊस पाडत भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी दावा केला आहे.

आयपीएल २०२४ स्पर्धेत अभिषेक शर्माने धावांचा पाऊस पाडला आहे. पावरप्लेच्या षटकात फलंदाजी करताना त्याने एकाही गोलंदाजाला सोडलं नाही. शनिवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. हा सामन्यात अभिषेक शर्माने पहिल्या चेंडूपासून हल्लाबोल करायला सुरुवात केली. त्याने २ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ४६ धावा केल्या. त्याला आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याची संधी होती. मात्र चौकार मारण्याच्या प्रयत्नात तो बाद होऊन माघारी परतला.

टी -२० वर्ल्डकपसाठी दावेदार..

अभिषेक शर्मा आयपीएल २०२४ स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात २३ चेंडूंचा सामना करत ६३ धावांची तुफानी खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार आणि ७ षटकार मारले होते. त्याने आपल्या तुफान फकेबाजीने निवड कर्त्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यासह संघात स्थान मिळवण्यासाठी दावा केला आहे. त्याच्या आयपीएल २०२४ स्पर्धेतील आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ७ सामन्यांमध्ये २१५.९७ च्या स्ट्राइक रेटने २५७ धावा केल्या आहेत.

यादरम्यान त्याने १८ चौकार आणि २४ षटकार खेचले आहेत. अभिषेक शर्माची ही कामगिरी पाहता यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलच्या टेन्शनमध्ये नक्कीच वाढ झाली असणार आहे. कारण रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करण्यासाठी शुभमन गिल यशस्वी जयस्वालपैकी एकाला संधी मिळण्याची चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sports legends retiring: मेस्सी, धोनी आणि...! 2026 मध्ये हे खेळाडू होणार निवृत्त

Maharashtra Live News Update: भाजप बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी घरात कोंडले

BMC Election: मुंबईत शिंदेसेनेला मोठं खिंडार, बड्या नेत्यासह २०० पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

BMC Election : मुंबईत राज ठाकरेंना ऐनवेळी धक्का; मनसेच्या ११ निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Prarthana Behere Mangasultra Designs: अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या मंगळसूत्राची क्रेझ कायम, हे आहेत 5 ट्रेडिंग पॅटर्न

SCROLL FOR NEXT