WTC Points Table Twitter/@BCCI
Sports

WTC Points Table : बांगलादेशला लोळवल्यानंतर गुणतालिकेत मोठा उलटफेर; टीम इंडिया कुठल्या स्थानी?

WTC Points Table: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये झालेल्या बदलाचा फायदा थेट टीम इंडियाला झाला.

Nandkumar Joshi

WTC Points Table : भारतानं बांगलादेशला पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत केलं. त्यानंतर दोन तासांतच ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. या दोन्ही सामन्यांच्या निकालानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Point Table) पॉइंट टेबलमध्ये मोठा उलटफेर झाल्याचं बघायला मिळालं. या निकालांचा परिणाम थेट तीन संघांवर झाला. पॉइंट टेबलमध्ये झालेल्या बदलाचा परिणाम थेट भारत, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेवर झाला.

भारतानं (Team India) 18 डिसेंबरला बांगलादेशविरुद्ध (Ind vs Ban) पहिला कसोटी सामना जिंकला. त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतानं झेप घेतली. मात्र, भारताच्या विजयानंतर दोन तासांनीच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं विजय मिळवला. भारतानं पॉइंट टेबलमध्ये जी झेप घेतली होती, त्यात लगेच बदल झाला. (Latest Marathi News)

भारतानं (Team India) बांगलादेशला १८८ धावांनी पराभूत केलं. त्यानंतर बरोबर दोन तासांनी ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेला ब्रिस्बेन कसोटीत सहा विकेटनं नमवलं. ब्रिस्बेन कसोटीनंतर गुणतालिकेत लागोपाठ दोन मोठे बदल झाले.

भारताची डबल झेप, दक्षिण आफ्रिकेला फटका

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये झालेल्या बदलाचा फायदा थेट टीम इंडियाला झाला. भारतीय संघानं बांगलादेशविरुद्ध १८८ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर भारत चौथ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला. तर ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची एका स्थानानं घसरण झाली, तर भारताला दुप्पट फायदा झाला. भारतानं आता थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली. (Maharashtra News)

ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी, भारत दुसऱ्या क्रमांकावर

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलिया (Aus Vs SA) ७६.९२ टक्क्यांसह पहिल्या स्थानी कायम आहे. तर दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा मोठा फटका बसला आहे. ते तिसऱ्या स्थानी घसरले आहेत. तर भारतीय संघाला फायदा झाला आहे. भारत आता दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. भारत ५५. ७७ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : धक्कादायक! दारुच्या नशेत ५ जणांचा घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार

Dombivli News : डोंबिवलीत खांदेरी-उंदेरी किल्ल्यांची भव्य प्रतिकृती; स्वराज्य ग्रुपचा उपक्रम ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

Gold and Silver: भारतीय सराफ बाजारात होणार भूकंप; सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण

Diwali 2025: दिवाळीत अस्थमाच्या रुग्णांचा वाढू शकतो त्रास, अशी घ्या काळजी

Maharashtra Politics : ऐन दिवाळीत शरद पवारांना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT