Ajinkya Rahane Shardul Thakur Saamtv
Sports

WTC Final Viral Video: शाब्बास, खेळत रहा! रहाणे- शार्दुलची इंग्लडच्या मैदानावर 'मराठी'तून रणनिती; हटके संवादाचा व्हिडिओ व्हायरल

ICC World Test Championship: या व्हिडिओमध्ये रहाणे शार्दुलचे कौतुक करताना दिसत आहे.

Gangappa Pujari

WTC Final Ind Vs Aus: इंग्लंडमधील ओव्हल येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेत दोन मराठी खेळाडूंनी टीम इंडियाकडून खेळताना चांगलीच झुंज दिली. दिवसाच्या पहिल्याच षटकात के.एस. भरतची विकेट गामावल्यानंतर भारतीय चाहत्यांमध्ये फॉलोऑनची भीती पसरली होती. मात्र त्यानंतर शार्दुल आणि रहाणेने भारताचा गड राखला.

या दमदार खेळी दरम्यान, दोघांनी मराठीतून रणनितीही आखली ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रहाणे आणि शार्दुल ठाकूर मराठीतून संवाद साधताना दिसत आहेत.

जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम (WTC Final) सामन्यातील पहिले दोन दिवस भारतासाठी खराब ठरले. सुरूवातीला नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने दमदार सुरूवात केली. ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेड (१६३) आणि स्टीव्ह स्मिथ (१२१) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर कांगारूंनी पहिल्या डावात ४६९ पर्यंत मजल मारली.

भारतीय गोलंदाजांना आलेले अपयश आणि ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी केलेली अप्रतिम खेळी पाहता पहिल्या डावात भारताला मोठा धक्का बसला. कांगारुंनी ४६९ धावांचा डोंगर उभारल्यानंतर भारतीय फलंदाजांनी मात्र साफ निराशा केली. आघाडीची ढेपाळली असताना मराठमोठ्या शार्दुल ठाकूर आणि अजिंक्य रहाणेने टीम इंडियाला आशेचा किरण दाखवला. या सामन्यात रहाणेने ८१ तर शार्दूलने ५१ धावांची खेळी केली. (Latest Cricket News)

या खेळी दरम्यान रहाणे (Ajinkya Rahane) आणि शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) मराठीमध्ये संवाद साधला, ज्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रहाणे शार्दुलचे कौतुक करताना दिसत आहे. तसेच त्याला घाई न करण्याचाही सल्ला देताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओवर क्रिकेटप्रेमींनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Station : कृपया प्रवाशांनी लक्ष द्या! अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं, नवीन नाव काय? जाणून घ्या

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

Dhananjay Munde : बंजारा-वंजारा एकच? धनंजय मुंडेंच्या विधानानं वाद पेटला, वाचा स्पेशल रिपोर्ट

OBC Reservation : कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी होणार; मंत्री बावनकुळे यांच्यांकडून प्रशासनाला आदेश

SCROLL FOR NEXT