Vinesh Phogat Coach 
Sports

Vinesh Phogat : विनेश फोगाटचा मृत्यू झाला असता...कोचकडून धक्कादायक खुलासा, 'त्या' रात्रीची भीषण कहाणी सांगितली

Vinesh Phogat Coach : विनेश फोगाटला पुरस्कार मिळालं नाही म्हणून अख्या देशाला दु:ख झालं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फायनलच्या आधी विनेशला अपात्र ठरवण्याच्या आदल्या रात्री काय घडलं होतं याचा मोठा खुलासा झालाय.

Bharat Jadhav

भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटची पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत अपात्र ठरवण्याविरुद्ध क्रीडा लवादाकडे दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली. विनेशसह देशाच्या आशेवर पाणी फेरलं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या फ्रिस्टाईल कुस्तीमध्ये विनेश ५० किलो वजनी गटात खेळत होती. अंतिम फेरीत गेल्यानंतर अख्या देशाचं लक्ष गोल्ड मेडलकडे लागलं होतं. पण अंतिम सामन्याच्या दिवशी तिचं वजन १०० ग्रॅमने अधिक भरल्याने तिला अपात्र करण्यात आलं.

त्यामुळे नियमानुसार ऑलिम्पिक समितीने तिला अपात्र ठरवत सर्वात शेवटच्या स्थानावर ठेवलं. याविरोधात तिने क्रीडा लवादाकडे दाद मागितली. पण तिची याचिका फेटाळून लावण्यात आली. एका रात्री विनेशचं वजन कसं वाढलं, असा प्रश्न केला जात होता. अंतिम सामन्याच्या अदल्यादिवशी काय घडलं याबाबत मोठा खुलासा झालाय. विनेशने तिच्या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी नियमानुसार तीन सामने जिंकत अंतिम फेरीतील प्रवेश पक्का केला. पण या तीन सामन्यानंतर तिचं वजन वाढलं होतं.

याबाबत तिचे प्रशिक्षक वॉलर ऍकोस यांनी एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये एक खुलासा करण्यात आला होता. परंतु काही वेळानंतर ती पोस्ट डिलिट करण्यात आली होती. त्यात त्यांनी एका क्षणी विनेशचा जीव जाईल, असं वाटलं होतं, अशी पोस्ट प्रशिक्षकाने घेतलीय. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार ऍकोस यांनी फेसबूकवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी हंगेरी भाषेत डिटेल्स लिहिल्या होत्या. 'उपांत्य सामन्यानंतर २.७ किलो वजन वाढलेलं होतं. त्यासाठी आम्ही १ तास २० मिनिटे व्यायाम केला. पण तरी दीड किलो वजन बाकी होतं. त्यानंतर ५० मिनिट विनेशने सौआना (Sauna) केल्यानंतरही तिला फारसा घाम आला नव्हता.

'आमच्याकडे काहीही पर्याय नव्हता. यानंतर मध्यरात्रीपासून पहाटे ५.३० पर्यंत तिने वेगवेगळ्या कार्डिओ मशीनवर वेळ घालवला. कुस्तीचे डावपेच खेळले. यादरम्यान तिने २-३ मिनिटेच आराम केला असणार, त्यानंतर तिने पुन्हा व्यायामाला सुरुवात केली. ' 'ती एका क्षणी खाली कोसळलेली. पण कसंबसं आम्ही त्यातून सावरलो. यानंतर ती सौआनामध्ये एक तासभर होती. मी हेतुपूर्वक नाट्यमय लिहित नाहीये, पण मला एक चांगलं आठवतंय एका क्षणी माझ्या मनात विचार आलेला तिचा कदाचीत जीव जाईल.' असं प्रशिक्षक म्हणालेत.

दरम्यान, विनेशला अपात्र ठरवल्यानंतर तिची प्रकृती बिघडल्याचे समजले. तिला हॉस्पिटलमध्येही दाखल करण्यात आले होते. यानंतर हॉस्पिटलमधून परत येताना तिच्याशी काय संभाषण झालेलं, याबाबतही तिच्या प्रशिक्षकांनी सांगितलं. कृस्तीपटू विनेश म्हणाली, 'कोच निराश नका होऊ. तुम्ही मला सांगितलं होतं की जर मी कोणत्याही कठीण परिस्थितीत सापडले, तर जेव्हा मला अधिक उर्जेची गरज असेल, तेव्हा मला हा विचार करायला हवा की मी जगातील सर्वोत्तम महिला कुस्तीपटूला (जपानची युई सुसाकी) पराभूत केलंय.'

'मी माझं लक्ष्य गाठलं आहे. मी सिद्ध केलंय की मी जगातील सर्वश्रेष्ठ कुस्तीपटूंपैकी एक आहे. आपण हे सिद्ध केलंय की गेम प्लॅन काम करतात. मेड्ल्स हे फक्त वस्तू आहे, पण तुमची कामगिरी कोणीही तुमच्यापासून हिरावू शकत नाही.', असं संवाद विनेशसोबत झाल्याचं त्यांनी सांगितलं .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT