कुस्तीपंढरीत दोन वर्षांने आखाडे भरणार; पुन्हा शड्डू घुमणार Saam TV
Sports

कुस्तीपंढरीत दोन वर्षांने आखाडे भरणार; पुन्हा शड्डू घुमणार

कोरोनामुळे (Coronavirus) दोन वर्षांपासून कुस्ती आखाडे बंद असल्याने पैलवान (Wresling Competition) अडचणीत आले होते.

संभाजी थोरात

मुंबई: कोरोनामुळे (Coronavirus) दोन वर्षांपासून कुस्ती आखाडे बंद असल्याने पैलवान (Wresling Competition) अडचणीत आले होते. मात्र आज शाहू ग्रुपच्या वतीने कुस्तीपंढरी कोल्हापूर मध्ये आयोजित केलेल्या कुस्ती आखाड्यामुळे पुन्हा एकदा शड्डू घुमला आहे. कोरोनामुळे सर्वच क्रीडा स्पर्धा बंद होत्या. गावोगावी होणाऱ्या कुस्ती स्पर्धाही बंद होत्या त्यामुळे ऐन उमेदीत असणाऱ्या पैलवानांमध्ये अस्वस्थता होती. स्पर्धा नसल्याने अनेकांना आर्थिक अडचणींनाही सामोरे जावे लागत होते. त्यामुळे कुस्ती स्पर्धा सुरू व्हाव्यात अशी मागणी होत होती. दुसरी लाट संपल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या शाहू सहकारी साखर कारखान्याने पुढाकार घेऊन इनडोअर कुस्ती आखाडा भरवला.

तीन दिवस चालणाऱ्या आखाड्याचे उद्घाटन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतराजे घाटगे आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या हस्ते झाले. हा कुस्ती आखाडा विनाप्रेक्षक झाला. कोरोनानंतर राज्यात पहिल्यांदाच अशाप्रकारे कुस्ती होत आहे. हा कुस्ती आखाडा म्हणजे कुस्तीला आधार देणारा ठरला आहे. अशा प्रकारचे आखाडे सर्वच संस्थानी भरवण्याची गरज कुस्ती प्रेमी व्यक्त केली. कागलमध्ये आजवर अनेक कुस्ती आखाडे झाले, कागलच्या घाटगे घराण्याने कुस्तीला राजाश्रय दिला. आता कोरोनानंतर पहिल्यांदा कुस्ती आखाडा पुन्हा सुरु करून नवा पायंडा पाडला आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून बंद असलेल्या आस्थापना जसे रुग्ण कमी होतील तशा सुरु झाल्या. त्यात खेळ सर्वात नंतर सुरु झाले. क्रिकेट, फुटबॅाल हे खेळ लवकर सुरु करण्यात आले, परंतु मैदानी खेळ राज्यसरकारकडून सुरु करायला परवानगी दिली नाही. आता राज्य सरकारने सर्वचं गोष्टी कोविड नियमांच पालन करुन सुरु केल्या आहेत. त्यामुळे सर्वच सत्रातून आनंद व्यक्त केला जात आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे याचा फटका शेतकरी व ग्रामस्थांना

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्यांसह ८०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT