WPL saam tv
Sports

WPL 2025: आजपासून महिला प्रीमियर लीग स्पर्धेला सुरुवात! केव्हा, कुठे अन् कधी पाहता येणार सामने?

WPL 2025 Opening Ceremony And Schedule: आजपासून महिला प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दरम्यान जाणून घ्या या स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेआधी महिला प्रीमियर लीग स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेला आजपासून (१४ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण ५ संघ जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्यासाठी जोर लावताना दिसून येणार आहेत. तर पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन ४ शहरांमध्ये केले जाणार आहे. ज्यात मुंबई, बंगळुरू, बडोदा आणि वडोदरा या ४ शहरांचा समावेश असणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या थाटामाटात या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ओपनिंग सेरेमनीचा कार्यक्रम पार पडेल. दरम्यान या स्पर्धेतील सामने केव्हा, कुठे आणि कधी पाहता येतील? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

केव्हा खेळला जाणार पहिला सामना?

महिला प्रीमियर लीग स्पर्धेतील पहिला सामना आज (१४ फेब्रुवारी) खेळला जाणार आहे.

स्पर्धेतील पहिला सामना कोणत्या २ संघांमध्ये खेळला जाईल?

या स्पर्धेतील पहिला सामना गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

महिला प्रीमियर लीग स्पर्धेतील पहिला सामना किती वाजता सुरू होईल?

महिला प्रीमियर लीग स्पर्धेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल. तर टॉस ७ वाजता होईल.

महिला प्रीमियर लीग स्पर्धेतील उद्घाटन सोहळा केव्हा पार पडेल?

या स्पर्धेपूर्वी होणारा उद्घाटन सोहळा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६:३० वाजता सुरू होईल.

महिला प्रीमियर लीग स्पर्धेतील सामने कुठे लाईव्ह पाहता येतील?

महिला प्रीमियर लीग स्पर्धेतील सामने स्पोर्ट्स १८ नेटवर्कवर लाईव्ह पाहू शकता.

महिला प्रीमियर लीग स्पर्धेची लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येईल?

महिला प्रीमियर लीग स्पर्धेच्या सर्व सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही जियो सिनेमा ऍपवर लाईव्ह पाहू शकता. यासह तुम्ही लाईव्ह अपडेट्स www.saamtv.esakal.com वर मिळवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

Actor Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदेंनी उभारलेल्या देवराईला अचानक आग

SCROLL FOR NEXT