wpl 2024 playoffs scenario know who will enter in womens premier league final royal challengers bangalore mumbai indians delhi capitals twitter
क्रीडा

WPL 2024 Playoffs: RCB चा प्लेऑफमध्ये प्रवेश! कोणत्या २ संघांमध्ये रंगणार WPL ची फायनल? वाचा समीकरण

WPL Playoffs Scenario: वुमेन्स प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. लवकरच या स्पर्धेतील प्लेऑफच्या सामन्यांना प्रारंभ होणार आहे.

Ankush Dhavre

WPL 2024 Final Scenario:

वुमेन्स प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेतील १९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात एलिस पेरीच्या शानदार खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्स संघावर विजय मिळवला आहे.

या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. प्लेऑफमध्ये जाणारे ३ संघ ठरले असून यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्सचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दरम्यान कोणता संघ अंतिम फेरीत जाणार? कसं असेल समीकरण? जाणून घ्या.

कोणता संघ जाणार फायनलमध्ये?

सध्या दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. मुंबईने या स्पर्धेत ८ सामने खेळले असून ५ सामने जिंकले आहेत. गुणांसह मुंबईचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. तर दिल्लीने ७ पैकी ५ सामने जिंकले असून १० गुण आहेत.

दिल्लीचा एक सामना अजूनही शिल्लक आहे. दिल्लीने जर गुजरातविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजय मिळवला. तर दिल्लीचा संघ थेट आयपीएलमध्ये प्रवेश करेल. या स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला संघ थेट फायनलमध्ये जाणार आहे. तर तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या संघात एलिमिनेटरचा सामना रंगणार आहे.

जर दिल्लीला आपल्या शेवटच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला, तर मुंबई आणि दिल्ली या दोन्ही संघांमध्ये ज्या संघाचा नेट रनरेट चांगला असेल तो संघ फायनलमध्ये प्रवेश करेल.

या संघांमध्ये होणार एलिमिनेटरचा सामना...

स्म्रिती मंधानाच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. जो संघ या यादीत दुसऱ्या स्थानी असेल तो संघ एलिमिनेटरच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासोबत दोन हात करताना दिसेल. हा सामना १५ मार्च रोजी दिल्लीत रंगणार आहे. तर स्पर्धेतील फायनलचा सामना १७ मार्च रोजी रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diljit Dosanjh: आधी देशात दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचे सरकारला ओपन चैलेंज,काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

SCROLL FOR NEXT