world cup winning team prize money 2024 Saam TV
Sports

Cricket World Cup Final : वर्ल्ड चँपियन बनताच टीम इंडियावर पैशांचा पाऊस; दक्षिण आफ्रिकाही झाली मालामाल, वाचा...

world cup winning team prize money 2024 : आयसीसीने टीम इंडियावर अक्षरश: पैशांचा पाऊसच पाडलाय. आयसीसीने टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आयसीसीने बक्षिसांची रक्कम जाहीर केली होती.

Satish Daud

आयसीसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने अतिशय धमाकेदार कामगिरी केली. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत भारताने तब्बल १७ वर्षानंतर टी-२० विजेतेपद पटकावलं. विशेष बाब म्हणजे, भारतीय संघाने संपूर्ण T20 विश्वचषक स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. अंतिम सामन्यातही भारतासाठी गोलंदाज आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी केली.

या विजयाचं भारतीय संघाला मोठं फळ मिळालं आहे. आयसीसीने टीम इंडियावर अक्षरश: पैशांचा पाऊसच पाडलाय. आयसीसीने टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आयसीसीने बक्षिसांची रक्कम जाहीर केली होती. यावेळी T20 विश्वचषकासाठी अंदाजे ९३.५ कोटी रुपये वितरित करण्याची घोषणा करण्यात आली.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील विश्वविजेत्या भारतीय संघाला तब्बल २०.३६ कोटी रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून मिळाली. तर उपविजेता ठरलेला दक्षिण आफ्रिकेचा संघही मालामाल झाला. आफ्रिकन संघाला १०.६४ कोटी रुपये मिळाले आहेत.

यावेळी उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांनाही बक्षिसांची मोठी रक्कमही मिळाली आहे. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना प्रत्येकी ६.५५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्याच वेळी, सुपर-८ मध्ये आपला प्रवास पूर्ण करणाऱ्या संघांना ३.१८ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

दुसरीकडे, ग्रुप स्टेजमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघांना २.०६ कोटी रुपये मिळाले आहेत. सुपर-८ पर्यंत प्रत्येक सामना जिंकण्यासाठी संघांना २५.९ लाख रुपये मिळाले आहेत. भारतीय संघाने सुपर-८ पर्यंत ६ सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने सुपर-८ पर्यंत ७ सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत भारताला १.५५ कोटी रुपये आणि दक्षिण आफ्रिकेला १.८१ कोटी रुपये मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वर्गात कुणी नव्हतं, महिलेसोबत 'नको त्या स्थितीत' शिक्षकाला पकडलं, विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शूट करून केला व्हायरल

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट! कधीपर्यंत लागू होणार? वाचा सविस्तर

Bachchu Kadu : समाज कल्याणचा निधी लाडक्या बहिणीकडे वळवला; बच्चू कडू यांची सरकारवर जोरदार टीका

Diwali Rangoli : यंदा दिवाळीला काढा फुलांची रांगोळी, घर दिसेल सुंदर अन् लोक करतील भरपूर कौतुक

Maharashtra Live News Update: बिद्री साखर कारखाना कर्मचाऱ्यांना दहा टक्के पगारवाढ लागू,

SCROLL FOR NEXT