World Cup 2023 Latest Points Table Saam tv news
क्रीडा

World Cup 2023: वर्ल्डकपच्या पहिल्या आठवड्यानंतर कोणता संघ टेबल टॉपर? टीम इंडिया 'या' स्थानी; पाहा लेटेस्ट पाँइंट्स टेबल

Ankush Dhavre

World Cup 2023 Latest Points Table:

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये लखनऊच्या मैदानावर रोमांचक सामना रंगला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दमदार खेळ करत बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा १३४ धावांनी धुव्वा उडवला.

यासह दक्षिण आफ्रिकेने सलग दुसरा विजय तर ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. यासह वर्ल्डकप स्पर्धेला १ आठवडा पूर्ण झाला आहे. दरम्यान या सामन्यानंतर कशी आहे वर्ल्डकपच्या पॉइंट्स टेबलची स्थिती जाणून घ्या.

सलग २ सामन्यांमध्ये २ विजय मिळवणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी विराजमान आहे. ४ गुणांसह न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे दोघांचेही ४-४ पॉइंट्स आहेत. मात्र नेट रनरेटच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने अव्वल स्थान गाठलं आहे.

भारतीय संघ पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी..

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय संघाने देखील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. भारताचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी कायम आहे. तर बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणारा पाकिस्तानचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे.

टॉप ४ मध्ये असलेल्या चारही संघांनी आतापर्यंत २-२ सामने जिंकले आहेत. त्यामुळे या चारही संघांचे पॉइंट्स ४-४ आहेत. (Latest sports updates)

गतविजेता इंग्लंडचा संघ २ पॉइंट्ससह पाचव्या स्थानी आहे. तर बांगलादेशचा संघ देखील २ पॉइंट्ससह सहाव्या स्थानी आहे. या संघांनंतर श्रीलंका, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघ आहेत.

हे संघ पॉइंट्स टेबलमध्ये क्रमशः सातव्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहे. आता १४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना जिंकून दोन्ही संघांना पॉइंट्स टेबलमध्ये वर जाण्याची संधी असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune CA Death Case: सीए तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची केंद्राकडून दखल, चौकशीचे दिले आदेश; 'ईवाय’ कंपनीवर गंभीर आरोप

Fulora Recipe : नवरात्री स्पेशल देवीसाठी बनवा भरीवाचा फुलोरा

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

SCROLL FOR NEXT