Shubman Gill saam Tv
Sports

Shubman Gill News : टीम इंडियाला पहिल्या सामन्याआधीच धक्का; शुभमन गिलची तब्येत अचानक बिघडली, खेळण्यावर प्रश्नचिन्ह

World Cup 2023 : गिल खेळू शकला नाही तर इशान किशन आणि रोहित शर्मा डावाची सुरुवात करू शकतात.

प्रविण वाकचौरे

Shubman Gill Dengue Positive :

आयसीसी वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्या सामन्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन शुभमन गिलची प्रकृती अचानक बिघडली आहे. शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात खेळण्याची शक्यताही कमी झाली आहे. मात्र पाकिस्तानसोबतच्या सामन्यापूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकतो. गिल खेळू शकला नाही तर इशान किशन आणि रोहित शर्मा डावाची सुरुवात करू शकतात.

शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. गिल आणि रोहितच्या ओपनिंग जोडीमुळे भारताला एक चांगली सुरुवात मिळत असल्याचं मागील काही सामन्यातून दिसून आलं आहे. त्यामुळे शुभमन गिल संघात नसेल तर त्याची अनुपस्थिती नक्कीच जाणवेल. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार , शुभमन गिलची डेंग्यू चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. शुक्रवारी काही चाचण्यांनंतर संघ व्यवस्थापन गिलच्या खेळण्याबाबत निर्णय घेतील.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वीच गिल आजारी पडला आहे. अशा परिस्थितीत हा भारतीय संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, तो पहिला सामना खेळू शकेल की नाही? या संदर्भात परिस्थिती स्पष्ट नाही. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक गिलच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे. (Sports News)

पूर्ण फिट व्हायला किती दिवस लागू शकतात?

चेन्नईला पोहोचल्यापासून शुभमनला अचानक खूप ताप आला. ताप जास्त असल्याने त्याच्या चाचण्या केल्यानंतर त्याला डेंग्यूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. बरे होण्यासाठी आणि पूर्णपणे फिट होण्यासाठी गिलला 7 ते 10 दिवस लागू शकतात, अशी माहितीही समोर येत आहे.

वर्षभरात दमदार कामगिरी

शुभमन गिल या वर्षातील भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे. त्याने यावर्षी वनडे क्रिकेटमध्ये एक हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एका द्विशतकाचाही समावेश आहे. भारताला विश्वचषक जिंकायचा असेल तर त्यात गिलची भूमिका खूप महत्त्वाची मानली जाते. अशा परिस्थितीत गिल लवकरात लवकर बरा व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT