World Cup 2023 Saam TV x (Twitter)
क्रीडा

World Cup 2023 : हिटमॅन रोहित जोरात; यंदाच्या वर्ल्डकपमध्ये मोडणार ख्रिस गेलचा विक्रम?

Bharat Jadhav

world cup 2023 Rohit sharma Record :

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माचं रौद्ररुप पाहायला मिळत आहे. रोहितने आपल्या फलंदाजीची सुरुवात स्फोटक पद्धतीने करत आहे. आज धर्मशाला येथे न्युझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्माने धमाकेदार फलंदाजी केली. २७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरुवात केली.(Latest News)

रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी ११ षटकात ७१ धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने ४० चेंडूत ४६ धावांची खेळी केली. याच सामन्यात रोहितने एबी डिव्हिलिअर्सचा एक विक्रम मोडलाय. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये रोहित गेलचा सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम देखील मोडण्याची शक्यता आहे. रोहित प्रत्येक सामन्यात वेगवेगळे विक्रम मोडत नवीन विक्रम बनवत आहे.

धर्मशालाच्या मैदानात रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलिअर्सचा षटकारांचा विक्रम मोडला. रोहित आता वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा खेळाडू बनलाय. तर पहिल्या स्थानावर वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आहे.

डिव्हिलिअर्सचा विक्रम मोडला

एबीचा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्माला ४ षटकारांची गरज होती. आज रोहित शर्माने ४ षटकार मारत हा विक्रम नावावर केला. वर्ल्ड कपमध्ये डिव्हिलिअर्सने आतापर्यंत ३७ षटकार मारलेत. तर रोहित शर्माने आज ४ षटकार मारत ४० षटकार मारण्याचा विक्रम केलाय. या विक्रमाच्या यादीत युनिवर्स बॉस ख्रिस गेल सध्या पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. ख्रिस गेलच्या नावावर ४९ षटकारांची नोंद आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. (सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा)

वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

  • ख्रिस गेल (वेस्ट इंडीज) - ४९ षटकार

  • रोहित शर्मा (भारत) - ४० षटकार

  • एबी डिव्हिलियर्स (दक्षिण अफ्रीका) - ३७ षटकार

  • रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - ३१ षटकार

  • ब्रेंडन मॅक्युलम (न्यूझीलंड) - २९ षटकार

दरम्यान रोहित शर्माने यंदा आक्रमक फलंदाजी करत प्रतिस्पर्धी गोलंदाजांना घाम फोडलाय. पहिल्या चेंडूपासूनच रोहित शर्मा आक्रमक फलंदाजी करत आहे. रोहित शर्माने यंदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० षटकार मारले आहेत. एका वर्षात ५० षटकार मारणारा रोहित शर्मा पहिला आशियाचा खेळाडू ठरलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

SCROLL FOR NEXT