New Zealand vs Pakistan: Saam tv
क्रीडा

New Zealand vs Pakistan: पाकिस्तानची न्यूझीलंडवर मात, फखरच्या खेळीने सेमी फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा पल्लवीत

New Zealand vs Pakistan: विश्वचषकात पाकिस्तानने न्यूझीलंडवर सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार २१ धावांनी विजय मिळवला आहे.

Vishal Gangurde

New Zealand vs Pakistan Updates:

विश्वचषकात पाकिस्तानने न्यूझीलंडवर सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार २१ धावांनी विजय मिळवला आहे. फखर जमानच्या खेळीमुळे पाकिस्तानला विजय मिळवता आला आहे. फखरने ८१ चेंडूत १२६ धावा केल्या. डकवर्थ लुईस नियमानुसार विजय मिळाल्यामुळे पाकिस्तानच्या सेमी फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. (Latest Marathi News)

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानसमोर जिंकण्यासाठी ४०२ धावांचं आव्हान ठेवलं होतं. पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. अब्दुल्ला फक्त चार धावांवर बाद झाला. अब्दुल्ला बाद झाल्यावर पाकिस्तानवर दबाव निर्माण झाला.

चार षटकानंतर पाकिस्तानने एक गडी गमावून १२ धावा केल्या होत्या. एक गडी बाद झाल्याने पाकिस्तानचा संघ संयमाने खेळत होता.

आठ षटकानंतर फखर जमान आणि बाबर यांनी खेळ दाखवण्यास सुरुवात केली. फखर जमान आणि बाबर यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाईला सुरुवात केली. फखरने आक्रमक खेळी करत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ३९ चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्यानंतर फखर जमानने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला.

फखर जमानने ६ चौकार आणि ९ षटकारांच्या ६३ चेंडूत शतक ठोकलं. फखरकडून धावांचा पाऊस सुरु असताना खराखुरा पाऊसही मैदानात पडला. त्यामुळे सामना थांबविण्यात आला. मैदानावर पाऊस आला त्यावेळी बाबर आझम ४७ धावांर खेळत होता. दोघांनी १५४ धावांची भागीदारी रचली होती.

पाऊस थांबल्यानंतर खेळ पुन्हा सुरु झाला. पुढे आझमननेही अर्धशतक ठोकलं. फखर जमान १२६ धावांवर खेळत असताना पुन्हा पाऊस सुरु झाला. या पावसामुळे पाकिस्तान आणि न्यूझीलंडमधील सामना थांबविण्यात आला. त्यानंतर डकवर्थ लुइस नियमानुसार पाकिस्तानचा संघ २१ धावांनी जिंकला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

Today Horoscope: अचानक हाती पैसा मिळेल, पगारवाढ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT