Virat Kohli-Gautam Gambhir-Naveen Ul Hak Saam TV
Sports

Virat-Gambhir News : मिटलं एकदाचं! विराटचं कौतुक करताना गंभीरला शब्द अपुरे, मैदानात नवीन-कोहलीची गळाभेट, VIDEO

World Cup 2023, INDvsAFG : अफगाणिस्तानच्या ज्या खेळाडूमुळे या वादाला तोंड फुटलं होतं, त्या नवीन-उल-हकने देखील विराटचा आदर करत नमतं घेतलं.

प्रविण वाकचौरे

Virat Kohli-Gautam Gambhir News :

माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने विश्वचषक 2023 मध्ये पुन्हा एकदा विराटचं तोंड भरुन कौतुक केलंय. विराटचं कौतुक करताना गंभीरला शब्द अपुरे पडत होते. आयपीएलमध्ये झालेल्या वादानंतर हे दोन दिग्गज खेळाडू कधी एकमेकांचं तोंड बघतील का? अशी शंका अनेकांच्या मनात होती. अनेकांना वाटत होतं की दोघांमधील वाद मिटावा. (Latest Marathi News)

मात्र गंभीरने पुढाकार घेत मोठ्या मनाने या वादावर एकदाचा पडदा टाकला आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानच्या ज्या खेळाडूमुळे या वादाला तोंड फुटलं होतं, त्या नवीन-उल-हकने देखील विराटचा आदर करत नमतं घेतलं.

विराटने देखील नवीनच्या पुढाकाराचा तेवढ्याच सन्मामाने स्वीकार केला. आज अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात या दोन्ही गोष्टी काही मिनिटाच्या अंतराने क्रिकेट फॅन्सना पाहायला मिळल्या. (Latest Sports News)

नेमकं काय झालं?

भारत-अफगाणिस्तानचा सामना ज्या अरुण जेटली मैदानात आज खेळला जात आहे, तिथे विराट कोहली पॅव्हेलियन आणि गौतम गंभीर स्टॅण्ड शेजारीच आहेत. या अभिमानास्पद गोष्टीबद्दल बोलताना गौतम गंभीरने २०११ आणि २०२३ च्या विश्वचषकाची तुलना केली. गौतम गंभीरने म्हटलं की, त्यावेळी विराट कोहलीच्या नावाचं पॅव्हेलियन नव्हतं आणि माझ्या नावाचं स्टॅण्ड देखील नव्हतं. कधी विचारही केला नव्हता की आमचे स्टॅण्ड आणि पॅव्हेलियन असतील.

मात्र ही गोष्ट पाहिल्यानंतर,केलेली मेहतन आठवते. सगळे चांगले-वाईट दिवस आठवतात. जेवढा घाम गाळलाय तो आठवतो. मात्र आपल्या नावाचं पॅव्हेलियन पाहिल्यानंतर मेहनतीचं चीज झाल्याची भावना मनात असते. कारण ज्यावेळी तुम्ही अंडर १४, अंडर १९ खेळायला इथे आले असाल तेव्हा विचारही केला नसेल की एक दिवस याच मैदानात तुमच्या नावाचं स्टॅण्ड किंवा पॅव्हेलियन असेल. याठिकाणी आल्यानंतर हा तुमच्यासाठी भावनिक नाही तर अभिमानास्पद क्षण हवा, अशा शब्दात गंभीरने विराट आणि स्वत:च्या क्रिकेटमधील यशस्वी प्रवासाबद्दल सांगितलं. (World Cup 2023)

विराटची नवीनला 'जादू की झप्पी'

आयपीएलमधील वादानंतर विराट आणि नवीन आज पहिल्यांदाच मैदानात आमने-सामने आले. आजच्या सामन्यात दोघं एकमेकांसमोर कसे येणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. विराट बॅटिंगला आला त्यावेळी दोघांची नजरानजर देखील झाली. मात्र २६व्या षटकात विराट आणि नवीन यांच्यात मनोमिलन पाहायला मिळालं. दोघांनी सगळं विसरुन आधी हस्तांदोलन केलं आणि नंतर गळाभेटही घेतली. दोघांनी दाखवलेल्या खेळ भावनेमुळे क्रिकेटसाठी आजचा दिवस खास ठरला. एकीकडे मैदानात विक्रमांचा पाऊस पडला. मात्र त्यापेक्षाही खेळांडूच्या नात्यांमधील ओलाव्यासाठी आजचा दिवस आठवणीत राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT