World CUP 2023 Saam Tv (ICC X)
क्रीडा

World CUP 2023: अफगाणिस्ताननं इतिहास रचला, चक्रव्यूहात अडकलेल्या इंग्लंडचा लाजिरवाणा पराभव

Bharat Jadhav

England vs Afghanistan:

वर्ल्डकपमधील १३ वा सामना इंग्लंड आणि अफगाणिस्तानच्या संघात झाला. हा सामना नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झाला. या स्टेडियमवर अफगाणितास्तानच्या संघाने विक्रम केला. या वर्ल्डकपमध्ये दुबळ्या समजल्या जाणाऱ्या अफगाणितास्तानने गतविजेत्या इंग्लंडच्या संघाला लोळवलं. आधी अफगाणितास्तानच्या पठाण फलंदाजांनी ब्रिटिश गोलंदाजांनी चोपलं. त्यानंतर अफगाणितास्तानच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या नाकीनऊ आणलं. अफगाणितास्तानने दिलेल्या २८५ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची अवस्था खूप बिकट झाली. (Latest News)

कर्णधार ज्योस बटलरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. अफगाणिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. या संधीचा फायदा घेत अफगाणिस्तानच्या संघाने चौफेर फटकेबाजी करत ४९.४ षटकांत २८४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या नाकीनऊ आले. अफगाणच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले आणि गतविजेत्या इंग्लंडवर ६९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. अफगाणिस्तानचा हा यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिला आणि मोठा विजय ठरला.

इंग्लंडचा फलंदाजाला दमदार फलंदाजी करता आली नाही. इंग्लंडच्या डावाची सुरुवात जॉनी बेअरस्टॉ आणि डेव्हिड मालन यांनी केली. मात्र बेअरस्टॉ दुसऱ्या षटकामध्ये बाद झाला. फारुकीने त्याला बाद करत अफगाणिस्तानला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेला जो रूट सुद्धा स्वस्तात परतला. तर ७व्या षटकामध्ये मुजीफने क्लीन बोल्ड करत अफगाणिस्तान संघाला दुसरे यश मिळवून दिले. डेव्हिड मालन हा एकाकी झुंज देत होता. परंतु १३व्या षटकांत नबीने त्याला बाद केलं.

दरम्यान पहिल्यांदा फलंदाजी करताना अफगाणच्या संघाने १० गडी गमावत २८४ धावा केल्या. रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली. अफगाणिस्तानसाठी ही भागीदारी विश्वचषकातील सर्वात मोठी सलामीची भागीदारी ठरली. ही सलामीची जोडी तुटल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत इंग्लंड समोर २८४ धावांचा डोंगर उभा केला. मधल्या काळातील अलीखीलने ५८ धावांची खेळी केली. त्यानंतर रशीद खान आणि मुजीब यांनी अनुक्रमे प्रत्येकी २३ आणि २८ धावांची खेळी करत अफगाणिस्तान संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख, जाणून घ्या;सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीचं जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT