Gukesh d Saam tv
Sports

D Gukesh: डी गुकेशला बक्षीसाची निम्मी रक्कम सरकारला द्यावी लागणार; Tax कापून किती पैसे शिल्लक राहणार?

D Gukesh Prize Money: डी गुकेशने काही दिवसांपूर्वी वर्ल्ड चॅम्पिनय होण्याचा मान पटकावला. दरम्यान त्याला मिळालेल्या रकमेवर त्याला भारत सरकारला कर द्यावा लागणार आहे.

Ankush Dhavre

D Gukesh Prize Money: गेल्या काही दिवसांपासून युवा बुद्धिबळपटू डी गुकेश तुफान चर्चेत आहे. चर्चेत असण्यामागचं कारण म्हणजे, या १८ वर्षीय खेळाडूने सर्वात युवा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकावला आहे. संपूर्ण जगभरातून या युवा खेळाडूवर कौतुकाचा वर्षाव केला जातोय. आता त्याच्या विजयानंतर त्याच्या प्राईज मनीबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. (D Gukesh News In Marathi)

गुरुवारी झालेल्या फायनलमध्ये डी गुकेशने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव केला. डिंग हा गतवर्षीचा वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू आहे.

मात्र त्याचा फायनलमध्ये पराभव करत गुकेशने वर्ल्ड चॅम्पियनचा खिताब पटकावला. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, त्याला प्राईज मनी म्हणून मिळालेल्या रकमेतून केवळ अर्धी रक्कम मिळणार आहे. कारण त्याच्या प्राईज मनी मधून ४२.५ टक्के टॅक्स वसूल केला जाणार आहे.

वर्ल्ड चॅम्पिनयशिपचा खिताब पटकावणाऱ्या डी गुकेशला प्राईज मनी म्हणून १३ लाख डॉलर्स म्हणजे, ११.०३ कोटी रुपये मिळाले होते. मात्र आता त्याच्या प्राईज मनीमधून ४.६७ कोटी रुपये टॅक्स स्वरुपात कापले जाणार आहेत. (D Gukesh Chess Championship Prize Money)

जर एखाद्या खेळाडूला सरकारकडून किंवा खेळ महासंघाकडून जर प्राईज मनी मिळालं असेल, तर त्यावर टॅक्स द्यावा लागत नाही. मात्र एखादा खेळाडू जर एखादी स्पर्धा जिंकून आला असेल, तर त्याला नियमानुसार टॅक्स द्यावा लागतो. डी गुकेश हा अवघ्या १८ वर्षांचा आहे. आता आपल्या खेळाच्या बळावर तो वयाच्या १८ व्या वर्षीच करोडपती झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali: प्राजक्ता जणू सौंदर्याची खाण...

Parbhani : आदर्श शेतवाटणी! दोन प्राध्यापक भावांनी शेतकरी भावाला दिला अधिक हिस्सा; मुलांचे शिक्षण व लग्नाचीही घेतली जबाबदारी

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

SCROLL FOR NEXT