भारत पाकिस्तान सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना दोन्ही संघांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान बाबर आझमकडेही फॉर्ममध्ये येऊन स्वत:ला सिद्ध करण्याची संधी असणार आहे.
गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये बाबर आझम फ्लॉप ठरला आहे. या सामन्यापूर्वी त्याला कर्णधारपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याबाबत बोलताना त्याने भन्नाट उत्तर दिलं आहे.
आपल्या नेतृत्वाबाबत बोलताना बाबर आझम म्हणाला की, 'या एका सामन्यामुळे मला कर्णधारपद गमवावं लागेल याची मला कधीच भीती वाटली नाही. माझ्या नशीबात जे आहे ते होणार. ज्या गोष्टीसाठी मी पात्र आहे,ती गोष्ट मला मिळेलच. मला एका सामन्यामुळे कर्णधारपद मिळालेलं नाही आणि त्याच एका सामन्यामुळे माझं कर्णधारपद जाणार नाही.'
आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानविरूद्ध खेळताना भारतीय संघाचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला की, 'भारत- पाकिस्तान हे संघ द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमने सामने येतात.' (Latest sports updates)
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा रेकॉर्ड पाहिला तर, भारताचा संघ वरचढ राहिला आहे. दोन्ही संघ आतापर्यंत ८ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने सातही सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानचा संघ अजुनही खातं खोलू शकलेला नाही.
जर दोन्ही संघांचा वनडे क्रिकेटमधील रेकॉर्ड पाहिला, तर पाकिस्तानचा संघ वरचढ दिसून आला आहे. आतापर्यंत दोन्ही संघ १३४ वेळेस आमने सामने आले आहेत.
यापैकी ७३ सामन्यांमध्ये पाकिस्तानने बाजी मारली आहे. तर भारतीय संघाला केवळ ५६ सामने जिंकता आले आहेत. यादरम्यान ५ सामने हे अनिर्णित राहिले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.