wpl 2025 twitter
Sports

WPL 2025 Auction: WPL ऑक्शनची तारीख अन् ठिकाण ठरलं! वाचा सर्व माहिती एकाच क्लिकवर

WPL 2025 Auction Venue And Date: वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेचा ऑक्शन केव्हा आणि कुठे होणार? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेसाठीचा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबरला सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये पार पडला. आता या लिलावानंतर वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या लिलावाची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या लिलावाची तारीख आणि ठिकाण आता समोर आलं आहे.

आयपीएलचा लिलाव सौदी अरेबियात झाला होता. वुमेन्स प्रीमियर लीगचा लिलाव हा भारतातच होणार आहे. हा लिलाव येत्या १५ डिसेंबरला बंगळुरुत होणार आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या लिलावात दिल्ली कॅपिटल्सवर सर्वांचं लक्ष लागून असणार आहे. या संघाकडे सर्वाधिक ४.४० कोटी रुपये शिल्लक आहेत.

तर दिल्लीकडे सर्वात कमी २.५० कोटी रुपये शिल्लक आहेत. यूपी वॉरियर्सकडे ३.९० कोटी रुपये शिल्लक आहेत. तर मुंबई इंडियन्सकडे २.६४ कोटी रुपये शिल्लक आहेत.

वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेसाठी रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी

दिल्ली कैपिटल्स : अॅलिस कॅप्सी, एनाबेल सदरलेंड, अरुंधती रेड्डी, जेमिमा रॉड्रिग्ज, जेस जोनासेन, मारिजेन कॅप, मेग लेनिंग, मिन्नू मणी, राधा यादव, शेफाली वर्मा, शिखा पांडे, स्नेहा दीप्ती, तानिया भाटिया आणि तितास साधू .

गुजरात जायंट्स : अॅशले गार्डनर, बेथ मूनी, भारती फुलमाली, दयालन हेमलता, हरलीन देयोल, काशवी गौतम, लोरा वॉल्वार्ड्ट, मन्नत कश्यप, मेघना सिंग, फोएबे लिचफील्ड, प्रिया मिश्रा, सयाली सतघरे, शबनम शकील आणि तनुजा कंवर.

मुंबई इंडियन्स : अमनदीप कौर, अमनजोत कौर, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, हरमनप्रीत कौर, हेली मॅथ्यूज, जिन्तिमनी कलिता, किर्तन बालाकृष्णन, नताली साइवर, पूजा वस्त्राकर, सजना सजीवन, साइका इशाक, शबनिम इस्माइल, आणि यास्तिका भाटिया.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : आशा शोभना, दानी व्याट, एकता बिष्ट, एलिस पेरी, जॉर्जिया वेयरहॅम, कनिका आहूजा, केट क्रॉस, रेनुका सिंग, ऋचा घोष, एस. मेघना, श्रेयंका पाटील, स्मृती मंधाना, सोफी डिवाइन आणि सोफी मोलिनक्स

यूपी वॉरियर्स : एलिसा हेली, अंजली सरवानी, चमारी अट्टापट्टू, दिप्ती शर्मा, गोहर सुल्ताना, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, पूनम खेमनार, राजेश्वरी गायकवाड़, साइमा ठाकोर, श्वेता सहरावत, सोफी एक्लेस्टन, ताहलिया मॅक्ग्राथ, उमा छेत्री आणि वृंदा दिनेश.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati : अमरावती जिल्ह्यात ३५ टक्के शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून दूरच; शासनाची हमी हवेतच

Maharashtra Politics : दिवाळीत धमाका! भाजपच्या गळाला मोठा मासा, ६ टर्म आमदार कमळ घेण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

छत्रपती शिवाजी महाराज दिवाळी कसे साजरी करायचे? पाहा हे दुर्मिळ ७ फोटो

रक्तप्रवाहात अडथळा, नसा बंद पडण्याची भीती? खा १ फळ, हार्ट अटॅकचा धोका टळेल

SCROLL FOR NEXT