SMAT 2024: 6,6,6,4.. IPL आधी Hardik Pandyaचा कहर! एकाच ओव्हरमध्ये कुटल्या 28 धावा

Hardik Pandya Batting In Syed Mushtaq Ali Trophy: बडोदाकडून खेळताना हार्दिक पंड्याने दमदार फलंदाजी करुन दाखवली आहे. यादरम्यान त्याने एकाच ओव्हरमध्ये २८ धावा केल्या आहे.
6,6,6,4.. IPL आधी Hardik Pandyaचा कहर! एकाच ओव्हरमध्ये कुटल्या 28 धावा
hardik pandyatwitter
Published On

Hardik Pandya Batting In SMAT 2024: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत हार्दिक पंड्याची शानदार कामगिरी सुरु आहे. आयपीएलआधी त्याची बॅट आग ओकतेय. आता पुन्हा एकदा त्याने गोलंदाजांना भरदिवसा चांदण्या दाखवण्याचं काम केलं आहे. त्याने बडोदाकडून खेळताना एकाच षटकात धावांचा पाऊस पाडला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

6,6,6,4.. IPL आधी Hardik Pandyaचा कहर! एकाच ओव्हरमध्ये कुटल्या 28 धावा
SMAT 2024: 4 चेंडू 24 धावांची गरज, पंजाबच्या फलंदाजाने 4,6,6,6..खेचत सामना केला टाय; सुपर ओव्हरमध्ये लागला निकाल

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत बडोदाची शानदार कामगिरी

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत कृणाल पंड्या पंजाबचं नेतृत्व करतोय. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना, बडोदाने चारही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे, हार्दिक पंड्याची तुफान फटकेबाजी. कारण चारही सामन्यांमध्ये हार्दिकने शानदार फलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं आहे.

6,6,6,4.. IPL आधी Hardik Pandyaचा कहर! एकाच ओव्हरमध्ये कुटल्या 28 धावा
Ind vs Aus 2nd Test: टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार फलंदाज दुसऱ्या कसोटीतून होऊ शकतो बाहेर

एकाच षटकात चोपल्या २८ धावा

आपल्या पावरहिटींगसाठी ओळखल्या जाणाऱ्या हार्दिकने त्रिपुराविरुद्ध झालेल्या सामन्यातही दमदार फटकेबाजी केली. परवेज सुल्तानच्या एकाच षाटकात ४ षटकार आणि १ चौकार मारत २८ धावा चोपल्या. या खेळीदरम्यान त्याने २३ चेंडूंचा सामना करत ४७ धावांची खेळी केली.

रणजी ट्रॉफीतही बडोदाची शानदार कामगिरी

रणजी ट्रॉफी २०२४ स्पर्धेतही बडोदा संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी क्रृणाल पंड्याकडे सोपवण्यात आली आहे. या स्पर्धतही त्याच्या नेतृत्वात बडोदाने दमदार कामगिरी केली. या संघाने एकूण ५ सामने खेळले.

यादरम्यान या संघाला ४ सामने जिंकता आले. तर १ सामना ड्रॉ राहिला. आगामी हंगामात तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना दिसून येणार आहे. या संघाने एकूण ५ कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात स्थान दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com