Women maharashtra Kesari  Saam TV
Sports

मल्लांसाठी मोठी घोषणा; आता 'महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा' होणार...

देशातील कानाकोपऱ्यातून अगदी शेतकरी कुटुंबातून अनेक मुली कुस्तीकडे वळत आहेत. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.

Pravin

सोलापूर: महाराष्ट्राला आणि देशाला कुस्तीची मोठी परंपरा राहिली आहे. देशातल्या अनेक दिग्गज पैलवानांनी जगाच्या पाठीवर आपले स्वत:चे आणि देशाचे नाव मोठे केले आहे. याच कुस्तीने भारताला ऑलिंपिकमध्येही (olympics) अनेक पदकं जिंकून दिली आहेत. या खेळात सुरवातीचे अनेक वर्षे फक्त पुरुषांचे वर्चस्व होते. परंतु नंतर जसा काळ बदलत गेला तसे इतर क्षेत्राप्रमाणे स्त्रियांनीह या क्षेत्रात आपले नाव कमावले.

देशातील कानाकोपऱ्यातून अगदी शेतकरी कुटुंबातून अनेक मुली कुस्तीकडे वळत आहेत. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. १९६९ सालापासून 'महाराष्ट्र केसरी' (Maharashtra Kesari) ही स्पर्धा सुरू झाली आहे. यामध्ये फक्त पुरुषांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो. मात्र, आता हे चित्र बदलणार आहे. महिलांचा कुस्तीत सहभाग वाढावा यासाठी अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी सोलापुरात मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा महिला पैलावानांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

'या' ठिकाणी होणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

महाराष्ट्रात पुरुषांच्या महाराष्ट्र केसरी कुस्तीसोबतच महिलांच्याही स्पर्धा भरवल्या जाणार असल्याची घोषणा दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी सोलापूरमध्ये केली आहे. आता पनवेलमध्ये पहिली 'महिला महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धा' भरवणार असल्याचीही घोषणा अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी केली. ही कुस्ती स्पर्धा डीबीएस रेस्टलिंग फाऊंडेशनतर्फे भरवली जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

"महिला कुस्तीपटूंना व्यासपीठ मिळवण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करत आहोत. पुरुषांसाठी अनेक स्पर्धा आहेत. मात्र, महिलांसाठी पाहिजे तेवढ्या स्पर्धा नाही. त्यामुळे त्यांनाही समान संधी मिळण्याची गरज आहे," असे मत यावेळी दिपाली सय्यद यांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी महिलांसाठी मॅट आणि माती या दोन्ही प्रकारच्या कुस्तीसाठी प्रोत्साहन देणार असल्याचेही सांगितले.

पुरुष मल्लांप्रमाणे महिला मल्लांनीही आपल्या देशाला कुस्तीमध्ये पदके मिळवून दिली आहेत. हरियाणातील प्रसिद्ध महिला कुस्तीपटू गीता फोगाट आणि तिच्या इतर फोगाट बहिणींच्या आयुष्यावर थेट सिनेमेही बनवण्यात आल्याचं आपण पाहिले आहे. यामुळे मुलींचा कुस्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला असून मोठ्या प्रमाणात मुली या खेळाकडे वळताना दिसत आहेत. अशात 'महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धा' महिला मल्लांसाठी मोठं पाऊल मानले जात आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT