mithali raj 
Sports

पुणे : मिताली राजच्या 'रेल्वे' ने चंदीगढला २४६ धावांनी नमविले

Siddharth Latkar

महिला वरिष्ठ एक दिवसीय लीग स्पर्धेत रेल्वे संघाने गतवर्षी विजेतेपद पटकाविले हाेते. गेल्या वर्षी त्यांचा हंगाम शानदार होता आणि या वर्षीही अशाच कामगिरीची आशा संघाकडून असल्याचे मत क्रिकेट चाहते व्यक्त करु लागले आहेत. गेल्या मोसमात रेल्वे संघ हा एकमेव अपराजित संघ होता आणि अंतिम फेरीत झारखंडच्या महिला संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले हाेते.

पुणे : रेल्वेच्या कर्णधार मिताली राज Mithali Raj आणि सब्बीनेनी मेघना Sabbhineni Meghana यांच्या बहारदार खेळाचे प्रदर्शन पुणेकरांना पहावयास मिळाले. पुण्यातील डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर आज (रविवार) वरिष्ठ महिला गट करंडक क्रिकेट स्पर्धेतील एक दिवसीय सामना चंदीगढ विरुद्ध रेल्वे संघात खेळविला जात आहे. रेल्वे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रेल्वे संघाने निर्धारित ५० षटकांत ४ गड्यांच्या माेबदल्यात ३५६ धावा केल्या. women senior one day trophy 2021 railways vs chandigarh deccan gymkhana pune cricket

रेल्वेच्या सलामीच्या जाेडीतील सब्बीनेनी मेघना आणि पुनम राऊत यांच्यातील राऊत ही एक धावांवर बाद झाली. सब्बीनेनी मेघनाने १२१ चेंडूत तीन षटकांरासह २० चाैकार ठाेकत १४२ धावा केल्या. कर्णधार मिताली राजने दाेन षटकांसरह ११ चाैकार ठाेकून ६७ चेंडूत ८७ धावांचा पल्ला गाठला. रेल्वे संघाने निर्धारित ५० षटकांत ४ गड्यांच्या माेबदल्यात ३५६ धावा (नुजत परवीन २९ धावा, स्वागतिका रथ नाबाद ४५, डी हेमलता नाबाद ३५). चंदीगढच्या पारुल सैनीने दाेन, पी गुलेरिया आणि रजनी देवीने प्रत्येकी एक गडी बाद केला.

विजयासाठी ३५७ धावांचा पल्ला गाठण्यासाठी मैदानात आलेल्या चंदीगढच्या परुषी प्रभाकरला रेल्वेच्या मेघना सिंगने चार धावांवर पायचीत केले तर माेनिका सिंगला एक धावेवर झेलबाद करुन पॅव्हेलियन दाखविले. त्यानंतर आलेल्या अमनजाैत काैरला अंजली सारवाणीने एक धावेवर बाद केले. चंदीगढ संघाच्या दहा षटकांत तीन बाद १६ धावा झाल्या हाेत्या.

त्यानंतर रजनी देवी आणि मनिषा बदान यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना त्यात फारसे यश आले नाही. चंदीगढचा डाव ४२.२ षटकांत ११० धावांवर गारद झाला. रेल्वेच्या मेघना सिंग, स्वागतीका राथ, तनुजा कनवीर, डी. हेमलताने प्रत्येकी दाेन गडी बाद केले. दरम्यान या विजयाने रेल्वे संघाचे चार गुण झाले आहेत तर चंदीगढ संघ शून्य गुणांवर राहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT