Pakistan Team Saam TV
क्रीडा

Women Asia Cup: पाकिस्तानला सहा वर्षांनी जमलं, टीम इंडियाचा 13 धावांनी पराभव

पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अनेकांचा अंदाज चुकीचा ठरवला आणि टीम इंडियाला नमवलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

T20 Women Asia cup: पाकिस्तान महिला संघाला सहा वर्षांना टीम इंडियाला पराभूत करण्यात यश मिळालं आहे. महिला एशिया कप 2022मध्ये आज अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानने भारतीय महिला संघाचा 13 धावांना पराभूत केलं आहे. आजच्या सामन्यात निदा डारची उत्कृष्ट फलंदाजी आणि त्यानंतर भेदक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानला आजचा विजय शक्य झाला आहे.

एशिया कपमधील चौथ्या सामन्यात भारत-पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी समोरासमोर होते. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत टीम इंडियासमोर 138 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. दमदार फलंदाजी असलेल्या भारतीय संघासाठी हे लक्ष्य फारसे अवघड मानले जात नव्हते. मात्र पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अनेकांचा अंदाज चुकीचा ठरवला आणि टीम इंडियाला नमवलं.

पाकिस्ताननं सुरुवातीपासूनच सामन्यावर आपलं वर्चस्व कायम राखलं होतं. टीम इंडियाच्या अनुभवी खेळाडू स्मृती मानधना, मेघना आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी त्यांच्या नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही आणि ते लवकरच माघारी परतले. पण त्यानंतर हरमनप्रीत कौरच्या निर्णयाने अनेकजण चकीत झाले. हरमनप्रीतने हेमलता आणि पूजा वस्त्रकार यांना वर पाठवण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत 6 गडी गमावून 137 धावा केल्या. यादरम्यान निदा दारने नाबाद 56 धावा केल्या. तिच्या खेळीत 5 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. कर्णधार बिस्माह मारूफने 32 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघ 19.4 षटकांत सर्वबाद 124 धावाच करू शकला. भारताकडून रिचा घोषने 26 धावांची तुफानी इनिंग खेळली. त्याने 13 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकार लगावला. भारताकडून दीप्ती शर्मानेही 3 विकेट्स घेतल्या.

आशिया कपमध्ये पहिला विजय

महिला आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 12 सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान टीम इंडियाने 11 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने प्रथमच विजय मिळवला आहे. आशिया चषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानचा विक्रम खूपच खराब होता. मात्र कर्णधार बिस्माह मारूफसह खेळाडूंच्या कामगिरीने संघाला भारताविरुद्ध पहिला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT