औरंगाबाद: चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आता संपले आहेत, त्यांच्यावर बोलण्यापेक्षा विकासावर बोला, खैरे काय बोलतात याला महत्त्व नाही, रोज रोज तेच ते बोलतात, लोकं आता त्यांना कंटाळलेले आहेत अशी बोचरी टीका औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी केली आहे.
तसंच खैरेंना आता काही काम नाही, खैरेंचा विषय आता संपलेला आहे. खैरेंचे नाव घेणं पण आता उचित नाही. खैरेंनी शहराचे वाटोळे करून टाकले. आता शहराचा, जिल्ह्याचा विकासावर आपण बोलायला हवं असंही भुमरे म्हणाले.
पाहा व्हिडीओ -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची सभा सुरू असताना बहुतांश लोक उठून गेले गेले असता यावर बोलताना मंत्री संदीपान भूमरे म्हणाले की, आम्ही ढोंगीपणा केला असता तर येवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक जमले नसते आणि एकनाथ शिंदे यांच्या सभेला आलेली गर्दी पाहता इतिहासात ऐतिहासिक सभा झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सभेतून कोणीही उठून गेले नाही असे ठामपणे मंत्री संदिपान भुमरे म्हणाले. थोडे फार आत बाहेर येणे चालू होतं. उठूनच जायचं होते तर लोक आलेच कशाला असते? असा सवाल उपस्थित करत जमलेली लोकं शिंदेंना ऐकायलाच आले होते असे दावा देखील त्यांनी यावेळी केला. आम्ही शिवसेनेचे आहोत आणि एकनाथ शिंदे हेच आमचे प्रमुख आहेत असं म्हणत संदीपान भूमरे यांनी आम्हीच खरी शिवसेना असल्याचा पुनरुच्चार केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.