भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI येत्या काही दिवसांत नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची यादी जाहीर करणार आहे. असं म्हटलं जातंय की, यावेळी बोर्ड या कॉन्ट्रक्टमध्ये मोठा बदल करू शकतं. BCCI सचिव देवजित सैकिया यांच्या मते, बोर्ड टीम इंडियाच्या वार्षिक सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये सुधारणा करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) टीम इंडियाच्या वार्षिक सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधील A+ कॅटगिरी सस्पेंड करू शकते.
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी स्पोर्ट स्टारला दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टेस्ट आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेत फक्त वनडे सामने खेळण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा मोठा बदल कऱण्यात येणार आहे.
देवजित सैकिया यांनी पुढे म्हटलंय की, "हा प्लान लवकरच पुढे येण्याची शक्यता आहे. आम्ही एक कॅटेगिरी काढून टाकतोय. याचं कारण म्हणजे जे खेळाडू ए+ कॅटेगिरीसाठी उपलब्ध होते ते आता तीनपैकी फक्त एकाच फॉर्मेटमध्ये खेळतायत. त्यामुळे ए+ कॅटेगिरीमध्ये पात्र होण्यासाठी आम्ही जे निकष ठरवले होते ते पूर्ण होत नाहीत."
सध्याच्या करारानुसार, A+ श्रेणीतील खेळाडूला दरवर्षी ₹७ कोटी मिळतात. तर A श्रेणीतील खेळाडूंना ₹५ कोटी, B श्रेणीतील खेळाडूंना ₹३ कोटी आणि C श्रेणीतील खेळाडूंना ₹१ कोटी मिळतात. २०२५-२६ साठी अद्याप जाहीर न झालेल्या करारांमध्ये फक्त A, B आणि C कॉन्ट्रॅक्ट राहणार आहे.
गेल्या सिझनमध्ये फक्त चार खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा A+ श्रेणीमध्ये होते. तर आता फक्त जसप्रीत बुमराह हा त्यांच्यापैकी एकमेव खेळाडू आहे जो सर्व फॉरमॅटमध्ये खेळतो. विराट कोहली आणि रोहित शर्मा फक्त वनडे सामने खेळतात. तर रवींद्र जडेजा टेस्ट आणि वनडे टीमचा भाग आहे. जडेजानेही T20I मधून निवृत्ती घेतली आहे.
देवजीत सैकिया यांनी सांगितलं की, "A+ कॅटेगिरीमधील काही खेळाडूंनी तिन्ही स्वरूपात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पात्रता निकष पूर्ण करण्यासाठी पुरेसे खेळाडू शिल्लक नाहीत. एकाच फॉर्मेटमधील खेळाडू A+ साठी पात्र राहणार नाहीत. म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.