Rohit Sharma saam tv
Sports

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

Rohit Sharma retirement: रोहित शर्मा 2027 वनडे वर्ल्ड कप खेळणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मोहम्मद कैफ यांनी टीम मॅनेजमेंटने रोहितला उघडपणे पाठिंबा दिलेला नसल्याचं सांगत निवड समितीमध्येही संभ्रम असू शकतो, असं मत व्यक्त केलं.

Surabhi Jayashree Jagdish

रोहित शर्मा २०२७ च्या वनडे वर्ल्डकप खेळणार का? हा प्रश्न अजूनही कायम आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी १९ जुलै रोजी रोहितच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबत सुरू असलेल्या चर्चांना फेटाळून लावलं तरीही रोहित २०२७ च्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा भाग असेल, असे स्पष्टपणे कुणीही सांगितलेलं नाही. याच मुद्द्यावर भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने भाष्य केलंय.

लॉर्ड्स टेस्टपूर्वी निवृत्तीच्या चर्चांना उधाण

१६ जुलै रोजी काही माध्यमांमध्ये अशी बातमी आली होती की, १९ जुलै २०२६ रोजी लॉर्ड्सवर होणारा सामना हा रोहित शर्माचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असू शकतो. मात्र सामन्यापूर्वीच बीसीसीआयने या बातम्यांचं खंडन केलं.

यानंतर रोहितने लॉर्ड्सवर त्याच्या खेळीने सर्व टीकाकारांना उत्तर दिलं. त्याने ८४ चेंडूत १७ चौकार आणि ५ सिक्सच्या मदतीने १३८ रन्सची तुफानी खेळी केली. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील ३४ वं शतक होतं. त्याचप्रमाणे २०२६ मधील पहिलं शतकही ठरलं. मात्र या शानदार खेळीनंतरही रोहित २०२७ च्या वर्ल्ड कपच्या टीममध्ये रोहितच्या नावाचा विचार केला जाईल, असं अधिकृतपणे कुणीही जाहीर केलं नाही.

रोहितला स्पष्ट पाठिंबा मिळालेला नाही- मोहम्मद कैफ

मोहम्मद कैफने त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर या विषयावर बोलताना सांगितलं की, टीम मॅनेजमेंटकडून रोहित शर्मा २०२७ चा वर्ल्ड कप खेळणार असल्याचं स्पष्टपणं कधीच सांगण्यात आलेलं नाही. अनेक वेळा प्रशिक्षक किंवा सपोर्ट स्टाफमधील लोक म्हणतात की, रोहितला त्याचा नैसर्गिक खेळ खेळण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिलंय. पण आजपर्यंत कुणीही ठामपणे असं म्हटलं नाही की, 'रोहित शर्मा २०२७ च्या वर्ल्ड कपसाठी आमच्या योजनांचा महत्त्वाचा भाग आहे.' असं विधान होणंही गरजेचं आहे.

खराब फॉर्म आला तरी मॅनेजमेंटने साथ द्यावी

कैफच्या मते, रोहितचा फॉर्म कधी चांगला तर कधी खराब असू शकतो. एखादी सिरीज त्याच्यासाठी अपेक्षेप्रमाणे नसली तरी टीम मॅनेजमेंटने त्याच्या पाठीशी उभं असल्याचं स्पष्टपणं सांगायला हवं.

कैफने पुढे सांगितलं की, "रोहितला खेळण्याचं स्वातंत्र्य दिलंय असं हे सांगितलं जातं. पण त्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे असं कुणी म्हणालेलं नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. बाहेरून जे पाहतात त्यांना टीममध्ये नेमकं काय सुरू आहे, हे माहिती नसतं. पण मला असं वाटतं की, रोहितने आता स्वतःच ठरवलं आहे की त्याला कुणी संघातून बाहेर काढणार नाही. तो जेव्हा योग्य वाटेल तेव्हाच निवृत्तीचा निर्णय घेईल."

निवड समितीमध्येही संभ्रम असण्याची शक्यता

कैफने पुढे सांगितलं की, लॉर्ड्समधील सामना रोहितचा अखेरचा वनडे सामना ठरू शकतो, अशा बातम्या समोर आल्या होत्या. मात्र सामना सुरू होण्यापूर्वीच बीसीसीआयने स्पष्टीकरण दिलं आणि त्यामुळे परिस्थिती बदलली. त्यातच रोहितने शतक झळकावल्यामुळे चर्चांनाही वेगळं वळण मिळालं.

तरीही कैफच्या मते, अजूनही पडद्यामागे काहीसा संभ्रम असू शकतो. निवड समितीमध्येही रोहितला पुढच्या खेळामध्ये सहभागी करायचं की नाही यावर चर्चा सुरू असण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaata Marathi Movie: गरिबी, संघर्ष आणि मुलीचं स्वप्न; 'भाटा'मधून उलगडणार एका बापाची प्रेरणादायी गोष्ट

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

SCROLL FOR NEXT