IND vs AUS, Rohit Sharma News: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ४ टी-२० सामन्यांची मालिका नुकतीच संपन्न झाली आहे. ही मालिका झाल्यानंतर आता भारतीय संघासमोरील सर्वात मोठं आव्हान, बॉर्डर-गासवकर ट्रॉफीचं असणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरला रंगणार आहे. मात्र या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा खेळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होतोय.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्यांदा बापमाणूस झाला आहे. शूक्रवारी त्याची पत्नी रितिका सजदेहने मुलाला जन्म दिला आहे. शूक्रवारी ही बातमी चर्चेत आली होती. मात्र रोहितने पोस्ट शेअर करत याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. रोहितने आपल्या पोस्टमध्ये, ' 'आमच्या ४ लोकांचं कुटुंब...' असं लिहीलं आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटकरी दोघांनाही शुभेच्छा देताना दिसून येत आहेत.
पीटीआयच्या वृत्तानुसार, रितिकाने शुक्रवारी मुंबईतील स्थानिक हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या सामन्याला अजूनही ६ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे रोहित पर्थ कसोटी खेळण्याची शक्यता वाढली आहे. मात्र तो ऑस्ट्रेलियाला जाणार की नाही, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.
रोहितने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता खूप कमी आहे. रोहित फॉर्ममध्ये नसला, तरी भारतीय संघाला त्याची गरज आहे.
तो या संघाचा कर्णधार आहे. त्याच्याकडे ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव देखील आहे. त्यामुळे तो संघात असणं खूप गरजेचं आहे. तो ऑस्ट्रेलियाला केव्हा जाणार,याबाबत लवकरच अधिकृत माहिती येऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.