virat kohli with rohit sharma yandex
Sports

ICC Champions Trophy 2025: विराट अन् रोहित चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार का? जय शहांचा मोठा खुलासा

Virat Kohli- Rohit Sharma: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणं हे भारतीय संघासमोरील सर्वात मोठं आव्हान असणार आहे. दरम्यान विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळणार का?

Ankush Dhavre

भारतीय संघाने बारबाडोसमध्ये शानदार कामगिरी करत दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपवर नाव कोरलं आहे. फायनलमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ७ धावांनी दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. हा सामना जिंकून देण्यात विराट कोहली आणि रोहित शर्माने मोलाची भूमिका बजावली आहे.

भारतीय संघ अडचणीत असताना विराट कोहलीने ७६ धावांची शानदार खेळी केली आणि भारतीय संघाला आव्हानात्मक धावसंख्येवर पोहोचवलं. मात्र ही स्पर्धा झाल्यानंतर विराट, रोहित आणि जडेजाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान विराट कोहली आणि रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार का? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, ' संघातील सर्व वरीष्ठ खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघाकडून खेळताना दिसून येतील. टी-२० वर्ल्डकपच्या फायनलनंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजाने निवृत्ती जाहीर केली. मात्र हे दिग्गज खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळताना दिसून येणार आहेत.

ही क्रिकेट फॅन्ससाठी गुड न्यूज आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन फेब्रुवारी २०२५ मध्ये केले जाणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर आता भारतीय संघासमोरील पुढील आव्हान चॅम्पियन ट्रॉफी जिंकणं असणार आहे. मात्र भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार की नाही हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

काय म्हणाले जय शहा?

जय शहा यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीत म्हटले की, 'मला तरी हेच वाटतं की, भारतीय संघाने सर्व ट्रॉफी जिंकाव्या. आमची बेंच स्ट्रेंथ मोठी आहे. या संघातील केवळ ३ खेळाडू झिम्बाब्वे दौऱ्यावर जात आहेत. आमचा संघ ज्या गतीने पुढे जातोय ते पाहता, आमचं आव्हान चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप असणार आहे. या स्पर्धांमध्ये संघातील वरिष्ठ खेळाडूंना संघात स्थान दिलं जाईल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT