MS Dhoni आणि Sakshi पुन्हा होणार आई-बाबा? फोटो व्हायरल Saam Tv
Sports

MS Dhoni आणि Sakshi पुन्हा होणार आई-बाबा? फोटो व्हायरल

चेन्नई सुपर किंग्सनं दसऱ्याच्या दिवशी इंडियन प्रीमिअर लीगचं जेतेपद पटकावलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'कॅप्टन कूल' कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने काल (ता. 15) शुक्रवारी रात्री चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. CSK ने कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) 27 धावांनी पराभव केला. 2010, 2011 आणि 2018 मध्ये चेन्नईचा संघ आयपीएल विजेताही होता. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर Dubai International Stadium खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नईने नाणेफेक गमावली. त्यांनतर प्रथम फलंदाजी करत तीन गडी बाद 192 धावांची मजबूत धावसंख्या उभारली. नंतर त्यांच्या गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे कोलकाताला 9 बाद 165 पर्यंत रोखले. चेन्नईच्या या विजेतेपदानंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या कर्णधार धोनीची पत्नी साक्षी धोनीने अगदी उत्साहाने आनंद व्यक्त केला. चेन्नईची टीम जिंकताच तिच्या आजूबाजूच्या खास लोकांना मिठी मारून साक्षीने अभिनंदन केले.

जेव्हा साक्षी विजयाच्या जल्लोषात होती, तेव्हा ती गर्भवती होती असे वाटत होते. त्यामुळे लवकरच माहीच्या घरी आणखी एक नवीन पाहुणे येणार आहे असे दिसून येत आहे. साक्षी प्रेग्नन्ट असलेल्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या बातमीत असे म्हटले जात आहे की, धोनीची पत्नी साक्षी गर्भवती आहे आणि लवकरच त्यांच्या घरी एक छोटा पाहुणा येणार आहे. वृत्तानुसार, धोनीचा CSK टीममेट सुरेश रैनाची पत्नी प्रियंका रैना हिने साक्षीच्या गर्भधारणेविषयी माहिती दिली आहे. साक्षी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

SCROLL FOR NEXT