mohamme shami twitter
Sports

Mohammed Shami: शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कमबॅक करणार? समोर आली मोठी अपडेट

Mohammed Shami Comeback News In Marathi: मोहम्मद शमीच्या कमबॅकबाबत सर्वात मोठी अपडेट आली आहे.

Ankush Dhavre

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. आज बंगाल विरुद्ध बडोदा या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सामन्यात मोहम्मद शमी अॅक्शनमध्ये असणार आहे.

आज सर्वांची नजर शमीवर असणार आहे. शमीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाठवण्याची मागणी जोर धरु लागली आहे. शमी फिट तर झाला आहे, मात्र त्याला अजून वाट पाहावी लागणार आहे.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मोहम्मद शमीने फिटनेस टेस्ट दिली आहे.क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने दिलेल्या माहितीनुसार, शमी सध्या तरी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊ शकत नाही.

या रिपोर्टमध्ये बीसीसीआयने त्याच्या फिटनेसवर शंका उपस्थित केली आहे. बीसीसीआयच्या मते, तो अजूनही मोठे स्पेल्स टाकू शकणार नाहीये. त्यामुळे बीसीसीआयची मेडिकल टीम अजूनही त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. बंगळुरुत दररोज त्याच्या फिटनेसबाबत नोंद केली जात आहे.

कर्णधार रोहित शर्मा काय म्हणाला?

शमी हा भारतीय संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. शमी संघात असणं भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचं आहे. दुसरा कसोटी सामन्यानंतर रोहित शर्माने शमीच्या कमबॅकबाबत भाष्य केलं होतं. तो म्हणाला होता की, ' शमीसाठी कमबॅक करण्याचे दार उघडे आहेत. पण त्याच्या गुडघ्यावर सुज आहे. अशा परिस्थितीत तो मोठ्या स्पेल्स टाकू शकणार नाही. यासह टीम मॅनेजमेंट त्याच्याबाबतीत कुठलीही रिस्क घेणार नाहीये.'

या मालिकेतील पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराह भारतीय संघाचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने २९५ धावांनी विजय मिळवल होता. त्यानंतर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा कर्णधार म्हणून परतला. या सामन्यात भारतीय संघाला १० गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. सध्या ही मालिका १-१ ने बरोबरीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

SCROLL FOR NEXT