IND vs BAN Playing 11 saam tv
Sports

IND vs BAN: बांग्लादेशाविरूद्ध बुमराहला टीममधून वगळणार? 'या' गोलंदाजाला मिळू शकते संधी, वाचा प्लेईंग 11

IND vs BAN Playing 11: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि तो प्रत्येक सामन्यात संघासाठी महत्त्वाचा ठरत आहे. पण, बांगलादेशविरुद्धच्या आगामी सामन्यात त्याला विश्रांती (Rest) देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापन घेऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे.

Surabhi Jayashree Jagdish

एशिया कप 2025 च्या सुपर-4 फेरीत भारतीय क्रिकेट टीम आता दुसऱ्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. पाकिस्तानवर सलग दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया आज बांगलादेशाविरूद्ध मैदानात उतरणार आहे. बुधवारी म्हणजेच आज दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर संध्याकाळी भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळाल्यास भारताचं फाइनलचं तिकीट जवळपास पक्कं होईल.

टीम इंडियाकडे सर्वांचे लक्ष

पाकिस्तानवर सहा विकेट्सने मिळालेल्या विजयानंतर भारताचा आत्मविश्वास उंचावला आहे. आता सर्वांचं लक्ष कर्णधार सूर्यकुमार यादव आणि त्यांच्या प्लेइंग-11 च्या निवडीवर आहे. या स्पर्धेत बांग्लादेश पहिल्यांदाच भारताविरुद्ध उतरणार असून उलटफेर करण्याची क्षमता या टीममध्ये आहे. त्यामुळे भारताला थोडं सावध राहावं लागणार आहे.

बुमराहला विश्रांती मिळेल का?

गेल्या सामन्यांपासून जसप्रीत बुमराह चर्चेचा विषय ठरतोय. पाकिस्तानविरुद्ध त्याने चार ओव्हर्समध्ये 45 रन्स दिले ते आणि महागात पडले होते. त्यामुळे टीम मॅनेजमेंट त्याला बांग्लादेशविरुद्ध विश्रांती देऊ शकते, जेणेकरून फाइनलसारख्या महत्त्वाच्या सामन्यांसाठी ते फिट राहतील.

जर बुमराह बाहेर बसला तर अर्शदीप सिंगचं कमबॅक निश्चित मानली जातंय. अर्शदीपने या स्पर्धेत ओमानविरुद्ध खेळताना आपल्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 100वी विकेट घेतली होती.

फलंदाजीत फारसा बदल होण्याची शक्यता नाही. पाकिस्तानविरुद्ध अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात करून दिली होती. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन अजूनही चांगल्या फॉर्ममध्ये दिसले नाहीत. तिलक वर्मा, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांना आतापर्यंत फारशी संधी मिळालेली नाही. पण टीमला त्यांच्याकडून महत्त्वाच्या योगदानाची अपेक्षा आहे.

भारताची संभाव्य प्लेइंग-11

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग / जसप्रीत बुमराह.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhishek Sharma : फायर हूँ मैं....पाकिस्तानला नडणारा अभिषेक शर्मा टी २० मध्ये @1

Jio vs Airtel: दररोज १.५ जीबी डेटा आणि कॉलिंगसह स्वस्त प्लॅन कोणाकडे आहे?

Jalgaon Heavy Rain : हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबेना

Ahilyanagar Rain : अहिल्यानगरमध्ये रस्ते वाहून गेले, पण दूध उत्पादकाने दोरीच्या साह्याने पोहोचवले दुधाचे कॅन | VIDEO

Metro : आता मेट्रोत रिल्स, व्हिडिओ कराल तर कारवाई होणार, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT