Ms Dhoni Ben Stokes  Saamtv news
Sports

IPL 2023: ठरलं तर! महेंद्रसिंग धोनीच्या जागी बेन स्टोक्स CSK चा कर्णधार? ख्रिस गेलने गेला महत्वाचा खुलासा

चेन्नई सुपर किंग्जने इंग्लडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला तब्बल 16.5 कोटी किमतीत खरेदी केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

IPL 2023: नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग्जने इंग्लडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला तब्बल 16.5 कोटी किमतीत खरेदी केले. या खरेदीनंतर बेन स्टोक यंदाच्या आयपीएल लिलावातील दुसरा महागडा खेळाडू ठरला.

चेन्नईने बेन स्टोक्सला आपल्या ताफ्यात घेतल्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या जागी स्टोक्स चेन्नईचे नेतृत्व करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. यावर वेस्ट इंडियचा स्टार खेळाडू ख्रिस गेलने महत्वाचा खुलासा केला आहे. (IPL 2023)

आयपीएल 2023 च्या लिलावात परदेशी मुख्यतः इंग्लडच्या अष्टपैलू खेळाडूंवर मोठी बोली लावली गेली. यामध्ये सॅम करणने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला पंजाब किग्सने खरेदी केले तर बेन स्टोक्ससाठी चेन्नईने 16.5 कोटी मोजले. यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendrasingh Dhoni) जागी आयपीएल 2023मध्ये बेन स्टोक्सवर चेन्नईच्या कर्णधार पदाची धुरा असेल अशी चर्चा सुरू झाली. ज्यावर क्रिस गेलने महत्वाचा खुलासा केला आहे.

चेन्नईचे नेतृत्व कोणाकडे असेल याबद्दल बोलताना ख्रिस गेलने सांगितले की, जोपर्यंत महेंद्रसिंग धोनी मैदानात आहे तो पर्यंत तोच संघाचे नेतृत्व करतो विषय संपला. स्टोक्स आणि धोनीच्या रुपाने चेन्नईकडे दोन धुरंधर असतील आणि माझ्या मते स्टोक्स धोनीचा आदर करतो त्यामुळे तो धोनीलाच नेतृत्व करण्याची संधी देईल.

याबद्दल पुढे बोलताना गेल म्हणाला की, कोणत्याही संघाशी जुळवून घेणे खेळाडूसाठी महत्वाचे असते. आणि ज्याप्रमाणे स्टोक्सची खेळी आहे तो नक्कीच सीएसके संघात फिट बसेल. त्याचबरोबर सीएसके संघात अष्टपैलू खेळाडूची जाणवणारी उणीव स्टोक्समुळे भरुन निघेल. असेही गेलने यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ फरार

Rain Alert : पावसाचा तडाखा बसणार; ५ राज्यात होणार मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात कुठे बरसणार?

Face Care: या सोप्या स्किनकेअर टिप्स फॉलो करुन व्हा फेस्टिव्हलसाठी तयार, दिवाळीत चेहरा दिसेल ग्लोईंग आणि सोफ्ट

दिवाळीपूर्वी यमराजांसाठी दिवा कधी आणि कसा लावावा?

Metro Line 7A च्या बोगद्याचे काम पूर्ण, थेट विमानतळावर पोहोचता येणार; २ तासांचा प्रवास ४० मिनिटात

SCROLL FOR NEXT