arjun tendulkar  saam tv
Sports

Arjun Tendulkar Debut: वानखेडेवर होणार अर्जुनचे पदार्पण! दुखापतग्रस्त गोलंदाजाच्या जागी रोहित देणार संधी

Will Arjun Play Today: या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

Ankush Dhavre

MI VS KKR IPL 2023: आज आयपीएल २०२३ स्पर्धेतील २२ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. मुंबई इंडियन्स संघाला या हंगामातील ३ पैकी केवळ १ सामन्यात विजय मिळवता आला आहे.

त्यामुळे हा सामना मुंबई इंडियन्स संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

आज अर्जुनला मिळणार पदार्पणाची संधी ?

यावर्षी झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्स संघाने अर्जुन तेंडुलकरला ३० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. मात्र त्याला आतापर्यंत एकही सामना खेळण्याची संधी दिली नाहीये. मुंबई इंडियन्स संघातील काही प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर होत आहेत. तरीदेखील अर्जुनला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी दिली गेली नाहीये.

जोफ्रा आर्चरची दुखापत वाढवणार मुबंईचं टेंशन?

अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की, जोफ्रा आर्चरच्या जागी अर्जुन तेडुंकरला संधी दिली जाऊ शकते. गेल्या सामन्यात देखील जोफ्रा आर्चर हा दुखापतीमुळे संघाबाहेर होता. त्याच्याऐवजी रिले मेरेडिथला संधी दिली गेली होती. मात्र त्याने देखील ९ पेक्षा अधिकच्या ईकोनॉमिने धावा खर्च केल्या होत्या. (Latest sports updates)

आयपीएल २०२३ स्पर्धेसाठी असा आहे मुंबई इंडियन्स संघ:

कॅमेरून ग्रीन, रोहित शर्मा (क), इशान किशन, जसप्रीत बुमराह, टीम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, जोफ्रा आर्चर, डेवाल्ड ब्रेविस, टिळक वर्मा, रिले मेरेडिथ, जेसन बेहरेनडॉर्फ, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर, रमणदीप सिंग, शम्स मुलानी, नेहल वाधरा , कुमार कार्तिकेय, संदीप वॉरियर, हृतिक शोकीन, आकाश मधवाल, अर्शद खान, राघव गोयल, दुआने यान्सन, ट्रिस्टन स्टब्स आणि विष्णू विनोद.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Phone In Toilet: तुम्हाला टॉयलेटमध्ये फोन वापरण्याची सवय आहे? आरोग्यावर होतील'हे' गंभीर परिणाम

Government Taxi Service: राज्यात लवकरच सुरू होणार सरकारी रिक्षा-टॅक्सी सेवा; Ola, Uber ला देणार टक्कर

Priyanka Gandhi: पहलगाम हल्ल्यावरून लोकसभेत गदारोळ; प्रियंका गांधींचा अमित शहांवर जोरदार हल्ला, म्हणाल्या... VIDEO

Weather Update: श्रावणात रंगणार ऊन-पावसाचा खेळ; पावसाची १५ दिवस सुट्टी

McDonalds Buisness : मॅकडोनाल्ड्सवर संसदेत बंदी घालण्याची मागणी; प्रसिद्ध कंपनीचा व्यवसाय किती कोटींचा आहे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT