jos buttler twitter
Sports

WI vs ENG: गुडाकेशने एका हाताने पकडला अविश्वसनीय कॅच! बटलरला विश्वासच बसेना - VIDEO

Gudakesh Motie Catch: वेस्टइंडिजचा खेळाडू गुडाकेशने क्षेत्ररक्षण करत असताना जोस बटलरचा एक भन्नाट झेल घेतला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

वनडे मालिकेनंतर वेस्टइंडिज आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने बाजी मारली. या सामन्यात फिल सॉल्टची ताबडतोड फलंदाजी पाहायला मिळाली.

त्याने वेस्टइंडिजच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. तुफान फटकेबाजीसह त्याने आपल्या टी -२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तिसरं शतक पूर्ण केलं. मात्र तुफान चर्चेत राहिला, तो गुडाकेश मोतीने टिपलेला कॅच. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

या सामन्यात फलंदाजीला आलेल्या इंग्लंडला दमदार सुरुवात मिळाली होती. या डावात इंग्लंडचा कर्णधार सातव्या षटकात फलंदाजीला आला. त्यावेळी रोमारियो शेफर्ड गोलंदाजी करत होता.

शेफर्डच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर बटलरने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू सरळ थर्ड मॅनच्या दिशेने गेला. त्यावेळी गुडाकेश बाऊंड्री लाईनला क्षेत्ररक्षण करत होता. चेंडू वेगाने आपल्या दिशेने येतोय हे पाहून गुडाकेश धावला. त्यावेळी त्याने एका हाताने अप्रतिम झेल घेतला.

गुडाकेशने घेतला अप्रतिम कॅच

गुडाकेशने वेगाने बाऊंड्री लाईनच्या बाहेर जात असलेला एका हाताने अडवला. कॅच घेतल्यानंतर तो पडला, मात्र त्याने आपला पाय बाऊंड्री लाईनला लागू दिला नाही. हा कॅच पाहून जोस बटलरला आश्चर्याचा धक्का बसला.

गुडाकेश हसत होता. मात्र जोस बटलरला विश्र्वासच होत नव्हता की, गुडाकेशने हा झेल पकडला तरी कसा. अवघ्या काही मिली सेकंदांचा फरक पडला असता, तर चेंडू वेगाने सीमा रेषेच्या पार गेला असता. त्याने पकडलेल्या या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. काहींच्या मते, हा टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत पकडला गेलेला सर्वोत्तम कॅच आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी, अखेर काका-पुतणे एकत्र! दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती, अजितदादांची घोषणा

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का; भाच्याने केला अजित पवार गटात प्रवेश

Monday Horoscope : भगवान महादेवाची कृपा होणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडणार

Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळलं |VIDEO

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार; वंचितसोबत चर्चा अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT