virat-kohli saam tv news
Sports

Virat Kohli Nickname: विराट कोहलीला चिकू हे नाव कसं पडलं? वाचा मजेशीर किस्सा

Virat Kohli Nickname Story :टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराटला किंग कोहली, रनमशीन, चेज मास्टर या नावांनी ओळखलं जातं हे तर आपल्याला माहितीय. पण विराटला चिकू या नावानं देखील अनेक जण ओळखतात.

Ankush Dhavre

Virat Kohli Chiku Nickname Story:

आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटचा दबदबा पाहायला मिळाला आहे. विराटला कोणी रनमशीन म्हणून हाक मारतं. तर कोणी चेज मास्टर म्हणून हाक मारतं. दरम्यान विराट चिकू या टोपण नावाने देखील प्रसिद्ध आहे.

त्याचं हे टोपण नाव सर्वांनाच माहित आहे. भारतीय संघातील काही खेळाडू देखील त्याला चिकू नावाने हाक मारतात. मात्र त्याचं नाव चिकू कसं पडलं? हे खूप कमी लोकांना माहित आहे. काय आहे यामागील किस्सा? जाणून घ्या.

विराट कोहलीला चिकू हे नाव कसं पडलं?

विराट कोहली देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली संघाचं प्रतिनिधित्व करायचा. बाहेर आलेले गाल आणि वेगळीच हेअरस्टाईल. या लुकमध्ये तो चिकूसारखाच दिसायचा. एका मुलाखतीत विराटने खुलासा करत म्हटलं होतं की, देशातंर्गत क्रिकेट खेळत असताना त्याने हेअरकट केला होता. या हेअरकटमध्ये तो आपल्या प्रशिक्षक अजित चौधरी यांना चिकूसारखा वाटू लागला.

याव्यतिरीक्त चिकू चंपक नावाचं एक कॉमिक कॅरेक्टरही होतं. विराट त्याच्यासारखाच दिसत होता. तेव्हापासून त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला चिकू म्हणून हाक मारायला सुरुवात केली. एमएस धोनी यष्टीरक्षण करत असताना विराटला चिकू अशी हाक मारायचा. (Latest sports updates)

अशी आहे कारकिर्द..

विराटच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने १११ कसोटी सामन्यांमध्ये ८६७६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २९ शतकं आणि २९ अर्धशतकं झळकावली आहेत. तर त्याच्या वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने २९२ सामन्यांमध्ये १३८४८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५० शतकं आणि ७२ अर्धशतकं झळकावली आहेत. तर टी-२० क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ११५ टी-२० सामन्यांमध्ये ४००८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि ३७ अर्धशतकं झळकावली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT