rinku singh ruturaj gaikwad jitesh sharma  saam tv
Sports

Team India Squad: रिंकू, ऋतुराज अन् जितेश शर्माला संघात स्थान का नाही मिळालं? खरं कारण आलं समोर

IND Vs WI T20I Series: रिंकू सिंग आणि जितेश शर्मासारख्या खेळाडूंना स्थान न मिळाल्याने चाहते भलतेच निराश असल्याचे दिसून आले आहे.

Ankush Dhavre

INDIA Vs WEST INDIES T20 Series: भारत वेस्ट इंडिज मालिका सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 12 जुलैपासून दोन्ही संघांमध्ये 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. पहिला कसोटी सामना डॉमिनिकाच्या मैदानावर रंगणार आहे.

तर 5 जुलै रोजी बीसीसीआयने वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या 5 टी -20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या करताना दिसून येणार आहे. तर सूर्यकुमार यादवला उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली गेली आहे. मात्र काही युवा खेळाडूंना या संघात स्थान दिलं गेलं नाही.

या मालिकेसाठी तिलक वर्मा आणि यशस्वी जयस्वाल सारख्या खेळाडूंना संघात स्थान दिलं गेलं आहे. मात्र रिंकू सिंग आणि जितेश शर्मासारख्या खेळाडूंना स्थान न मिळाल्याने चाहते भलतेच निराश असल्याचे दिसून आले आहे.

रिंकू आणि ऋतुराजला संधी न मिळण्याचं कारण काय?

आयपीएल 2023 स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या रिंकू सिंगला भारतीय संघात स्थान मिळण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र त्याला स्थान दिलं गेलं नाही. कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी त्याने फिनिशरची भूमिका पार पाडली होती.

गुजरातविरुद्धच्या सामन्यात त्याने एकाच षटकात 5 षटकार मारून संघाला सामना जिंकून दिला होता. तो फिनिशरच्या भूमिकेसाठी योग्य चॉईस आहे. मात्र हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल सारखे फलंदाज असताना रिंकू सिंगला संधी मिळणं कठीण आहे.

तर तिलक वर्मा हा कुठल्याही क्षणी कुठल्याही क्रमांकावर फलंदाजीला येऊन सामना बदलू शकतो. पीटीआयच्या वृत्तानुसार आयर्लंडविरुध्द होणाऱ्या टी -20 मालिकेसाठी रिंकू सिंगला भारतीय संघात स्थान दिलं जाऊ शकतं. (Latest sports updates)

जितेश शर्माला स्थान न मिळण्याचं कारण काय?

पंजाब किंग्ज संघाकडून खेळणाऱ्या जितेश शर्माला श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मालिकेसाठी संघात स्थान दिलं गेलं होतं. मात्र त्याला प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

वेस्ट इंडीज विरुद्ध होणाऱ्या टी -20 मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघात संजू सॅमसन आणि ईशान किशन हे 2 यष्टिरक्षक फलंदाज आहेत. हे 2 यष्टिरक्षक फलंदाज संघात असल्यामुळे जितेश शर्माला स्थान दिलं गेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Update: मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी, हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जारी

Video : तुंबलेलं पाणी काढायला आला खुद्द स्पायडर-मॅन, भिवंडीचा Spider-Man सोशल मीडियावर व्हायरल

Chanakya Niti : एखाद्याचं हृदय जिंकायचंय? वाचा चाणक्यांची ही 4 गुपितं

Bollywood : तिने अभिताभ बच्चनशी संबंध... विवाहबाह्य संबंधांवर रेखा यांचे वडील काय म्हणाले?

Maharashtra Rain Live News: पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT