Virat Kohli Saam Tv
क्रीडा

World Cup: सेमी फायनलमध्ये शतक कोहलीला 'विराट' खेळी करणं का होतं आवश्यक? काय होता त्याच्यावर डाग?

Bharat Jadhav

Virat Kohli Scored In knockout Match:

मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर न्यूझीलंड आणि भारताच्या संघात रोमांचक सामना झाला. सेमी फायनलच्या सामन्याने अनेकांच्या हृदयाचे ठोके वाढवले होते. या सामन्यात विराट कोहलीने ५० शतक करत सचिन तेंडुलरकरचा विक्रम मोडीत काढला. हा विक्रम मोडीत काढत विराट कोहलीवर असलेल्या १२ वर्षापासून असलेला डाग त्याने मिटवला आहे. यामुळे आव्हानाचा पाठलाग करण्यात माहीर असलेल्या विराट कोहलीवर टीका होत होती. नेमका या होता तो डाग हे जाणून घेऊ. (Latest News)

या सामन्यात विराट कोहलीने एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम केला. हा विक्रमही सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने २००३ मध्ये ६७३ धाव करण्याचा विक्रम केला होता. विराटने ११३ चेंडूत २ षटकार आणि ९ चौकारांसह ११७ धावा करत सचिनचा हाही विक्रम त्याने मोडला. याचबरोबर विराटने स्वत:वर असलेला सर्वात मोठा अपयशाचा कलंक पुसला. हा कंलक होता कोहलीला नॉकआउट स्पर्धेचा. या नॉकआउट फेरीत विराटला मोठी धावसंख्या करता आली नव्हती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या विक्रमासोबत विराटने स्वत:वरील एक सर्वात मोठा अपयशाचा कलंक पुसला. विराट कोहलीला नॉकआउट स्पर्धेत कधीच मोठी धावसंख्या करता आली नव्हती. विराट कोहलीने एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत एकूण ७ नॉकआउट सामने खेळले आहेत. काल वानखेडेवर झालेल्या सामन्याआधी खेळलेल्या ६ नॉकआउट सामन्यांमध्ये विराटला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाहीये.

ज्यातील चार सामन्यात त्याला चार वेळा दुहेरी आकडा देखील ओलांडता आला नाही. या दरम्यान कोहलीची सर्वाधिक धावसंख्या ३५ धावांची आहे. या धावा त्याने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर २०११ च्या एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात केले होते. दोन नॉकआऊट सामन्यात कोहलीला एक-एक धाव करुन बाद झाला होता. यामुळे विराट कोहली विराट सेमीफायनल किंवा नॉकआउट सामन्यात मोठी धावसंख्या उभारू शकत नाही, अशी टीका नेहमी त्याच्यावर केली जात होती.

नॉकआऊट सामन्यातील कोहली कामगिरी

  • २०११ ऑस्ट्रेलिया विरुद्ध उपांत्यपूर्व फेरी - २४ धावा

  • २०११ पाकिस्तान विरुद्ध सेमी-फायनल -०९ धावा

  • २०११ श्रीलंका विरुद्ध अंतिम सामना - ३५ धावा

  • २०१५ बांगलादेश विरुद्धचा उपांत्यपूर्व फेरी सामना - ०३ धावा

  • २०१५ ऑस्ट्रेलिया विरुद्धचा उपांत्य फेरी सामना - १ धाव

  • २०१९ न्यूझीलंड विरुद्धाचा उपांत्य फेरी सामना - एक धाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT