mohammed shami saam tv
Sports

IND vs ENG: फिट असूनही शमी प्लेइंग ११ मधून बाहेर; सूर्याने सांगितलं कारण

Mohamme Shami, IND vs ENG 1st T20I: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी -२० सामन्यासाठी मोहम्मद शमीला भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. काय आहे .यामागचं कारण?

Ankush Dhavre

इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ टी२० सामन्यांची मालिका सुरु आहे. कोलकात्यातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर या मालिकेतील पहिला टी-२० सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

मात्र जेव्हा प्लेइंग ११ ची घोषणा केली गेली, त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलं नव्हतं. शमीला प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवण्याचं नेमकं कारण काय? जाणून घ्या.

मोहम्मद शमीला प्लेइंग ११ मध्ये स्थान का नाही दिलं? (Why Mohammed shami is not playing)

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी फिट होऊन संघात परतला आहे. त्याला इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं जाईल असं म्हटलं जात होतं. पण असं झालेलं नाही.

सूर्याने त्याला प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवलं आहे. शमीला प्लेइंग ११ मधून बाहेर का ठेवलं? या प्रश्नाचं उत्तर देताना सूर्यकुमार यादव म्हणाला, ' शमीला बाहेर ठेवण्यामागे ठराविक कारण नाही. तो या संघाच्या कॉम्बिनेशनमध्ये बसत नसल्याने त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलेलं नाही.'

१४ महिन्यांनंतर भारतीय संघात कमबॅक

आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत शमी सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला होता. या स्पर्धेत शमीने शानदार गोलंदाजी केली होती. मात्र या स्पर्धेनंतर त्याला दुखापतीमुळे संघाबाहेर व्हावं लागलं होतं. तब्बल १४ महिने त्याला संघाबाहेर राहावं लागलं. आता फिटनेस पुन्हा मिळवल्यानंतर त्याने भारतीय संघात कमबॅक केलं आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

इंग्लंडचा संघ: बेन डकेट, फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टन, जेकब बेथेल, जेमी ओव्हर्टन, गस अॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड

भारतीय संघाची प्लेइंग ११: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

SCROLL FOR NEXT