ishan kishan saam tv
Sports

IND vs WI: विराटच्या जागी ईशान फलंदाजीला का आला? रोहितने सांगितलं थक्क करणारं कारण

Rohit Sharma On Ishan Kishan: दुसऱ्या डावात ईशान किशन चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. आता यामागचं खंर कारण समोर आलं आहे.

Ankush Dhavre

IND vs WI Rohit Sharma On Ishan Kishan Batting Promotion: भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत १-० ने विजय मिळवला आहे. मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबुत स्थितीत होता.

मात्र पावसामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे हा सामना ड्रॉ घोषित करण्यात आला. दरम्यान दुसऱ्या डावात ईशान किशन चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. आता यामागचं खंर कारण समोर आलं आहे.

विराटच्या जागी ईशान फलंदाजीला का आला?

पहिल्या डावात फ्लॉप ठरणाऱ्या ईशान किशनला दुसऱ्या डावात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी पाठवण्यात आले होते. विराट कोहलीच्या जागी फलंदाजी करण्याची संधी मिळताच ईशान किशनने संधीचे सोने केले.

त्याने ३४ चेंडूंचा सामना करत ५२ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि २ गगनचुंबी षटकार मारले. ईशान किशनच्या फलंदाजीमध्ये आक्रमक फलंदाज रिषभ पंतची झलक दिसत होती. (Latest sports updates)

रोहितने सांगितलं खरं कारण..

ईशान किशनचं कौतुक करताना कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, 'संघाला ईशान किशन सारख्या खेळाडूची गरज आहे. दुसऱ्या डावात आम्हाला जलद गतीने धावा करायच्या होत्या. हेच कारण होतं की,आम्ही त्याला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय घेतला. तो जराही घाबरला नाही. ही जबाबदारी स्विकारणारा तो पहिलाच खेळाडू होता.'

या सामन्याच्या पाजव्या दिवशी वेस्टइंडीज संघाला विजयासाठी २८९ धावांची गरज होती. मात्र पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. पहिल्या डावात मोठी आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघाने दुसरा डाव २ गडी बाद १८१ धावांवर घोषित केला होता.

हा सामना जिकंण्यासाठी भारतीय संघाने वेस्टइंडीज संघासमोर ३६५ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडीजला ७६ धावांपर्यंत मजल मारता आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

SCROLL FOR NEXT