IND vs AFG saam tv
Sports

IND vs AFG: भारत- अफगाणिस्तानची टेस्ट WTC चा भाग का नाही? वाचा काय आहे ICC चा नियम

World Test Championship: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मुल्लांपूर टेस्ट सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 चा भाग नाही. अफगाणिस्तानचा WTC मध्ये समावेश नसल्याने आणि फक्त एकच टेस्ट खेळली जात असल्याने हा सामना पॉइंट्स टेबलमध्ये गणला जाणार नाही.

Surabhi Jayashree Jagdish

पंजाबमध्ये सध्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमेव टेस्ट सामना खेळवला जातोय. 6 जून 2026 पासून न्यू चंडीगडच्या मुल्लांपूर क्रिकेट स्टेडियममध्ये हा टेस्ट सामना सुरु आहे. मात्र या सामन्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025-27 चा भाग मानण्यात आलेलं नाही. त्यामुळे त्याचा परिणाम WTC पॉईंट्स टेबलवर होणार नाही. या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की एवढा महत्त्वाचा सामना WTC मध्ये का नाही? याचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत.

WTC मध्ये फक्त 9 टीमचा समावेश

आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सध्या भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि वेस्ट इंडिज या 9 टीम्सचा समावेश आहे. अफगाणिस्तानला 2017 मध्ये टेस्ट दर्जा मिळाला असला तरी त्यांचा WTC मध्ये समावेश झालेला नाही.

यामागचं मुख्य कारण म्हणजे WTC मध्ये सहभागी होण्यासाठी टीम्सने ठराविक प्रमाणात टेस्ट सामने खेळणं आवश्यक असतं. अफगाणिस्तान वर्षाला फक्त 1 ते 2 टेस्ट सामने खेळत असल्याने त्यांना सध्याच्या सायकलमध्ये स्थान मिळालेलं नाही. त्यांच्यासोबतच झिम्बाब्वे आणि आयर्लंड या टीम्स देखील WTC बाहेर आहेत. मात्र 2027 नंतरच्या नव्या सायकलमध्ये या तिन्ही टीम्सचा समावेश करण्याबाबत आयसीसी विचार करतंय.

काय सांगतो आयसीसीचा नियम?

WTC नियमानुसार, कोणतीही सिरीज किमान 2 टेस्ट सामन्यांची असणं आवश्यक आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात फक्त एकच टेस्ट खेळवली जात असल्याने हा सामना WTC अंतर्गत येऊ शकत नाही. त्यामुळे हा सामना केवळ द्विपक्षीय मैत्रीपूर्ण टेस्ट (बायलॅटरल) म्हणून खेळवला जातोय.

WTC बाहेर असला तरी सामना महत्त्वाचा

हा सामना WTC चा भाग नसला तरी त्याचं महत्त्व कमी नाही. या सामन्यातील खेळाडूंच्या कामगिरीचा थेट परिणाम ICC रँकिंगवर होणार आहे. फलंदाज, गोलंदाज आणि ऑलराऊंडर खेळाडूंच्या रेटिंगमध्ये मोठे बदल होऊ शकतात. चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची रँकिंग सुधारू शकते. तर खराब कामगिरी करणाऱ्यांना नुकसानही सहन करावं लागू शकतं.

अफगाणिस्तानला टेस्ट दर्जा मिळून 9 वर्षे झालीयेत. त्यांनी आतापर्यंत फक्त 12 टेस्ट सामने खेळले आहेत. 2018 मध्ये भारताविरुद्ध बंगळुरूमध्ये झालेला त्यांचा पहिला टेस्ट सामना विशेष लक्षवेधी ठरला होता. ज्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृ्त्वाखाली टीम इंडियाने एक डाव आणि 262 रन्सने मोठा विजय मिळवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Ireland 1st T20I: भारताचा आयर्लंडकडून पहिल्यांदाच पराभव, 'या' ५ कारणामुळे सामन्यासह टीम इंडियानं गमवाली टी-२० मालिका

महसुलात 20 हजार कोटींचा घोटाळा? मुद्रांक शुल्कावर अधिकाऱ्यांचा डल्ला

Beijing Plane Crash: सर्वात उंच इमारतीला विमान धडकलं; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

लोहगड हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, सिया-चेतनचं प्रेम, खुनानंतर ब्लेम गेम, केतनला टक्कल, नात्यात दुराव्याचं कारण?

Maharashtra News Live Update: यवतमाळ शहरात मुसळधार पावसाला सुरूवात

SCROLL FOR NEXT